वोटर आयडी कार्डवर चक्क कुत्र्याचा फोटो, व्हायरल होतोय [PHOTOS]

Dog photo in Voter ID Card: एका व्यक्तीच्या मतदार फोटोवर चक्क एका कुत्र्याचा फोटो छापल्याची घटना समोर आली आहे. सध्या हे मतदार कार्ड सोशल मीडियावर बरंच व्हायरल होत आहे.  

photo of dog replaced by man on voter id card becoming viral
वोटर आयडी कार्डवर चक्क कुत्र्याचा फोटो, व्हायरल होतोय [PHOTOS]  |  फोटो सौजन्य: ANI

मुर्शिदाबाद: पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथील रामनगर येथे एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका नागरिकाला असं मतदार ओळखपत्र देण्यात आलं की, त्यावर चक्क  कुत्र्याचा फोटो लावण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील कर्माकर यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मतदार ओळखपत्रात काही दुरुस्तीसाठी नवा अर्ज केला होता. जेव्हा त्यांना दुरुस्तीसह नवीन मतदार कार्ड मिळालं तेव्हा या कार्डावर चक्क कुत्र्याच्या फोटो घेतली.

ते म्हणाले, 'काल मला दुलाल स्मृती शाळेत बोलावले आणि मला ओळखपत्र दिले.  अधिकाऱ्याने सही करून मला ओळखपत्र दिले पण त्यावरील फोटो त्याने पाहिला नाही. खरं तर हा माझा अपमान आहे. मी बीडीओ कार्यालयात जाऊन या प्रकाराबाबत तक्रार करणार आहे.' दरम्यान, या व्यक्तीने या प्रकरणी आपण दावा देखील दाखल करणार असल्याचं  सांगितले आहे.

तथापि ब्लॉग विभाग अधिकारी (बीडीओ) म्हणाले की, फोटो आधीच बदलण्यात आला आहे.  लवकरच कर्मकार यांना नवीन ओळखपत्र दिले जाईल. 

ते म्हणाले, 'हे काही शेवटचं मतदार ओळखपत्र नाही. जर चूक झाली असेल तर ती दुरुस्त केली जाईल. जिथवर कुत्र्याच्या फोटोचा प्रश्न आहे तर ही चूक एखाद्याने ऑनलाईन अर्ज करताना केली असेल. फोटो आधीपासूनच दुरुस्त केला गेला आहे. नागरिकाला दुरुस्त केलेलं नवं ओळखपत्र लवकरच मिळेल.'

महत्त्वाचे म्हणजे, अशा प्रकारच्या घटना अनेकदा होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकदा कागदपत्रांमधील नावांमध्ये तर सर्रास चुका होत असल्याचं दिसून आलं आहे.  बर्‍याच वेळा तर एका व्यक्ती ऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा मतदार कार्डवर फोटो छापून आल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. परंतु एखाद्या ओळखपत्रात चक्क एका प्राण्याच्या फोटोची फोटो छापण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. या या घटनेविषयी आणि ते मतदार कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी