सोशल मीडियावर तूफान गाजत आहे पहिल्या रात्रीचा हा फोटो, लोक तयार करत आहेत मजेदार Memes

व्हायरल झालं जी
Updated Feb 11, 2021 | 14:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

या फोटोत दिसत आहे की नवरा मुलगा कंप्यूटरवर काही काम करत आहे तर नववधू मागे पलंगावर बसलेली आहे. हा फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक याच्यावर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

Viral photo of first night
सोशल मीडियावर तूफान गाजत आहे पहिल्या रात्रीचा हा फोटो, लोक तयार करत आहेत मजेदार Memes  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • काय आहे पूर्ण प्रकरण?
  • काय म्हणत आहेत लोक?
  • पाहा लोकांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया

सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल (viral) होईल काही सांगता येत नाही. कधी कुणाचे नाव व्हायरल होते तर कधी एखादा मजेदार व्हिडिओ (video) व्हायरल होतो. सध्या मात्र एक वेगळीच गोष्ट व्हायरल झाली आहे. लग्नाचा एक फोटो (marriage photo) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसत आहे की नवरा मुलगा (bridegroom) कंप्यूटरवर (computer) काही काम करत आहे तर नववधू (bride) मागे पलंगावर बसलेली आहे. हा फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक याच्यावर मजेदार प्रतिक्रिया (funny reactions) देत आहेत.

काय आहे पूर्ण प्रकरण?

जसे या फोटोत स्पष्ट दिसत आहे, नववधू लग्नाच्या वेषात खोलीतील पलंगावर बसून नवऱ्याची वाट पाहात आहे तर पूर्ण लग्नाच्या वेषात नटलेला नवरा मुलगा कंप्यूटरवर बसून आपले फोटो अपलोड करत आहे. यावर काही लोक म्हणत आहेत की हा इसम वर्क फ्रॉम होम करत आहे. पण या नवऱ्या मुलाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

काय म्हणत आहेत लोक?

हा फोटो सोशल मीडियावर जाताच लोकांनी त्याच्यावर भरपूर मीम्स तयार केले. काही लोकांनी लिहिले आहे, " Hold On Babe let me check my twitter notification."

तर काही म्हणत आहेत, "Hold on babe let me delete my search history."

इतरही अनेक लोकांनी या फोटोवर आपापल्या कॉमेंट्स केल्या आहेत ज्या खूपच मजेदार आहेत.

पाहा लोकांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी