नवी दिल्ली: सोशल मीडियावर (Social media) रोज काही ना काही गोष्टी व्हायरल (viral) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ (video) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातली घटना ही एका नवऱ्या मुलाशी (groom) आणि नवऱ्या मुलीशी (bride) संबंधित आहे. हा व्हिडिओ लोक भरपूर शेअर (share) करत आहेत आणि त्याची मजाही (enjoyment) लुटत आहेत. हा व्हिडिओ आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षाही जास्त लोकांनी पाहिला आहे तर हजारो लोकांनी तो शेअर केला आहे आणि त्याच्यावर कॉमेंट केल्या आहेत.
हा व्हिडिओ रेणुका नावाच्या एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे आणि कधी शूट केलेला आहे याबद्दल काही माहिती मिळालेली नाही, पण यात दिसत आहे की लग्नसोहळ्यादरम्यान नववधू आणि वर स्टेजवर आहेत. यादरम्यान एक फोटोग्राफर सतत फक्त वधूचे फोटो काढत आहे. काही काळ नवरा मुलगा शांत राहतो, पण नंतर त्याला रहावले नाही आणि त्याने फोटोग्राफरच्या थोबाडीत लगावली.
यानंतर जे झाले तेही चकित करणारेच आहे. फोटोग्राफर थप्पड खाऊन हसू लागला तेव्हा वधूला हसू आवरेना आणि ती इतकी हसली की ती स्टेजवरच बसली. यादरम्यान नवरा मुलगा स्टेजवर फिरू लागला. हा व्हिडिओ आत्तापर्यंत दोन लाख 7 हजारपेक्षाही जास्त लोकांनी पाहिला आहे आणि 8 हजारपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केला आहे. 32 हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडिओला मिळाल्या आहेत.
एका यूजरने लिहिले, 'नवऱ्या मुलीचे आभार की तिने परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखली आणि कॅमेरामननेही वाईट वाटून घेतले नाही.' तर एका अन्य यूजरने लिहिले आहे, 'चांगली कल्पना आहे. मी माझ्या क्रशच्या लग्नात फोटोग्राफर म्हणून जाईन.' तर आणखी एकाने लिहिले आहे, 'किती चतुराईने या मुलीने तणावाचे वातावरण खेळीमेळीचे करून टाकले.'