Police Constable : कॅप्टन अभिनंदनसारख्या मिशा ठेवल्याने कॉन्स्टेबल निलंबित; म्हणाला... मी राजपूत आहे, नोकरी गेली तरी मिशी नाही काढणार

व्हायरल झालं जी
Updated Jan 10, 2022 | 16:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rakesh Rana Suspend | भोपाळमधील पोलीस हवालदार राकेश राणा यांच्या नोकरीवर त्याच्या जबरदस्त लांब मिशीमुळे टांगती तलवार आली आहे. त्याच्या लांबलचक मिशा भारतीय वायुसेनेचे शूर ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांच्या सध्याच्या मिशांसारख्याच आहेत. राणा यांना त्यांचे मित्रही अभिनंदन नावाने बोलतात. मात्र त्यांच्या विभागातील अधिकाऱ्याला त्यांची मिशी आवडली नाही आणि त्यांना निलंबित केले.

Police constable Rakesh Rana suspended by mustache like Captain Abhinandan
कॅप्टन अभिनंदन सारख्या मिशा ठेवल्याने कॉन्स्टेबल निलंबित  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भोपाळमधील पोलीस हवालदार राकेश राणा यांच्या नोकरीवर त्याच्या जबरदस्त लांब मिशीमुळे टांगती तलवार आली आहे.
  • कॉन्स्टेबल राकेश राणा हे विशेष पोलिस महासंचालक मध्यप्रदेश पूल भोपाळ सहकारी फसवणूक आणि सार्वजनिक सेवा हमी यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी राणा यांना निलंबित करण्यात आले होते. पोलिस महानिरीक्षक प्रशांत शर्मा यांनी निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
  • हवालदार राकेश यांनी या आदेशावर म्हटले की, सर मी राजपूत आहे आणि मिशी ठेवणे आमची शान आहे. नोकरी भलेही गेली असेल पण मी मिशी काढणार नाही. मी पहिल्यापासूनच अशा प्रकारची मिशी ठेवली आहे.

mustache like Captain Abhinandan | भोपाळ : भोपाळमधील (Bhopal) पोलीस हवालदार राकेश राणा (Police Constable Rakesh Rana) यांच्या नोकरीवर त्याच्या जबरदस्त लांब मिश्यांमुळे टांगती तलवार आली आहे. त्याच्या लांबलचक मिशा भारतीय वायुसेनेचे शूर ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांच्या सध्याच्या मिशांसारख्याच आहेत. राणा यांना त्यांचे मित्रही अभिनंदन नावाने बोलतात. मात्र त्यांच्या विभागातील अधिकाऱ्याला त्यांची मिशी आवडली नाही आणि त्यांना निलंबित केले. मात्र, कॉन्स्टेबल राकेश राणा यांनी आदेशाचे पालन केले नसल्याचे सहकारी फसवणूक आणि सार्वजनिक सेवा हमी संस्थेचे महानिरीक्षक (Inspector General) प्रशांत शर्मा (Prashant Sharma) यांचे म्हणणे आहे. लक्षणीय बाब म्हणजे हवालदार राकेश यांनी म्हटले की, "सर मी राजपूत आहे. नोकरी असेल की नाही मला माहित नाही. पण मी माझ्या मिशा कापणार नाही. साहेब, पोलिसांच्या नोकरीत मिशी छान दिसते. मिशीतच पोलिस हा खरा पोलिस असल्यासारखा दिसतो." असे राणा यांनी म्हटले. (Police constable Rakesh Rana suspended by mustache like Captain Abhinandan).  

Also Read : ​हे 5 पदार्थ पुरुषांचा वाढवतात स्टॅमिना

 

दोन दिवसांपूर्वी दिला आदेश 

कॉन्स्टेबल राकेश राणा हे विशेष पोलिस महासंचालक मध्यप्रदेश पूल भोपाळ सहकारी फसवणूक आणि सार्वजनिक सेवा हमी यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी राणा यांना निलंबित करण्यात आले होते. पोलिस महानिरीक्षक प्रशांत शर्मा यांनी निलंबनाचा आदेश जारी केला आहे. आदेशात असे म्हटले की, कॉन्स्टेबल ड्रायव्हर राकेश राणा यांचे टर्नआउट तपासले असता असे आढळून आले की त्याचे केस वाढले आहेत. विचित्र पध्दतीने मिशा मानेवर आल्या आहेत. त्यामुळे हे दिसताना खूप वेगळे आणि विचित्र दिसते. कॉन्स्टेबल राकेश यांना मिशा व्यवस्थित कापण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राकेश यांनी आदेशाचे पालन केले नाही. या कारणास्तव हवालदार राकेश राणा तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

Also Read : हिंगाचे सेवन पुरुषांसाठी अत्यंत फायदेशीर

राणा यांनी म्हटले मी राजपूत आहे...

 दरम्यान, हवालदार राकेश यांनी या आदेशावर म्हटले की, सर मी राजपूत आहे आणि मिशी ठेवणे आमची शान आहे. नोकरी भलेही गेली असेल पण मी मिशी काढणार नाही. मी पहिल्यापासूनच अशा प्रकारची मिशी ठेवली आहे." तर पाकिस्तानच्या सेनेकडून पकडले गेल्यानंतर कॅप्टन अभिनंदन यांची एक ओळख निर्माण झाली होती. त्यानंतरच लोक राणा यांना त्यांच्या मिशीच्या कारणास्तव अभिनंदन म्हणून बोलत होते. मला निलंबनाचा आदेश मंजूर आहे पण मी मिशी काढणार नाही. असे राणा यांनी म्हटले. 

Love Horoscope weekly प्रेमींसाठी पुढील 7 दिवस कसे असतील?

उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये कॉन्स्टेबलचा केला सन्मान 

मात्र, अलीकडेच उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांना कॉन्स्टेबल आकाश यांच्या मिशा आवडल्या होत्या. म्हणून त्यांनी आकाश यांना रोख १००० रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरव केला होता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी