14 मजली इमारतीत राहते एक शहर

Police station church post office… the whole city lives in a 14 storey building : जगात अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची माहिती मिळाल्यावर भले भले चक्रावून जातात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे.

Whittier City Where Everyone Lives In 14 Floor Tower Located At Passage Canal In Alaska Us
14 मजली इमारतीत राहते एक शहर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 14 मजली इमारतीत राहते एक शहर
  • अमेरिकेतील अनोखे शहर
  • अलास्कामध्ये एका 14 मजली इमारतीत अख्खे शहर

Police station church post office… the whole city lives in a 14 storey building : जगात अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची माहिती मिळाल्यावर भले भले चक्रावून जातात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेतील अलास्कामध्ये (alaska) एका 14 मजली इमारतीत अख्खे शहर सामावले आहे.

अलास्कातील बेगिच टॉवर या 14 मजली इमारतीत चर्च, पोस्‍ट ऑफिस, पोलीस स्टेशन, शाळा, बाजार, क्लिनिक अशा अनेक सोयीसुविधा आहेत. या 14 मजली इमारतीच्या शहरात 272 जण राहतात. या अनोख्या शहराचे नाव व्हिट्टिअर असे आहे. हे शहर पॅसेज नावाच्या कालव्याजवळ आहे. शहरात येण्याजाण्यासाठी 2 मैल लांबीचा भुयाराच्या रुपातला एक मार्ग आहे. हे भुयार रात्रीच्या वेळी बंद असते. 

बेगिच टॉवरच्या मागील भागात मुख्य इमारतीजवळ एक छोटी इमारत आहे. या इमारतीत शाळा आहे. मुख्य इमारत आणि शाळेची इमारत यांच्या दरम्यान येण्याजाण्यासाठी एक भुयार आहे. 

संपूर्ण शहर अतिशय सुंदर आणि निवांत आहे, असे या शहरात राहणारे नागरिक सांगतात. या शहरात राहणे हा अतिशय आनंददायी आणि मनःशांती देणारा अनुभव आहे, असेही या शहरात राहणारे नागरिक सांगतात.

Video: 'फायर स्टंट' करणं पडलं महागात, तोंडातून आग ओकताना भाजला चेहरा

Optical Illusion: करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वाघ टप्प्यात येऊन बसलाय, पण तुम्हाला दिसतोय का?

व्हिट्टिअर शहराची निर्मिती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात करण्यात आली. अमेरिकेच्या सैनिकांनी हे शहर उभारले. युद्ध काळात नागरिक सुरक्षित राहावेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन शहराची उभारणी करण्यात आली. या शहरात त्या काळात प्रामुख्याने सैनिक आणि मर्यादीत नागरिक वास्तव्यास होते. आता या शहरात नागरिकांची वस्ती आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी