साहेब! लग्नाचा वाढदिवस नाहीतर पश्चाताप दिन साजरा करण्यासाठी सुट्टी द्या; पोलीस दादाचा अर्ज होतोय व्हायरल

हे प्रकरण अमरावतीमधील असून येथील पोलिसाने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मागितली. आपल्या वरिष्ठांना यासाठी लेखी अर्ज केला असून हा अर्ज सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

Policeman   Application goes viral
शादी का लड्डू' खाऊन पोलीस दादाला आला पश्चाताप  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोलिसाचा अर्ज व्हायरल
  • लग्नाचा पोलीस दादाला आला पश्चाताप

अमरावती: लग्नाचा वाढदिवस कधी असतो हे माहिती नसले किंवा लक्षातच राहिले नाही तर घरी काय होतं हे फक्त नरोबाचं सांगू शकतो. नवऱ्या लोकांना बाकी काही लक्षात नाही राहिले तरी चालेल, पण बायकोचा आणि लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणं आवश्यक असतं. नाहीतर होम मिनिस्टर त्यांचा काय हाल करेल हे काही सांगता येत नाही. लग्नाविषयी नेहमी म्हटलं जाते कि लग्न न करुनही पश्चाताप होता आणि करुनही होतोच. परंतु लग्न करुन पश्चात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याच गटातील पीडित पोलीस दादानं लग्नाच्या वाढदिवसाला पश्चातापाचा दिवस म्हटलं आहे. इतकंच नाही तर हा दिन साजरा करण्यासाठी आपल्या वरिष्ठांकडे सुट्टीदेखील मागितली आहे. 

Application

हे प्रकरण अमरावतीमधील असून येथील पोलिसाने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मागितली. आपल्या वरिष्ठांना यासाठी लेखी अर्ज केला असून हा अर्ज सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. आता तु्म्ही म्हणाल, यात व्हायरल होण्यासारखं काय  आहे. आहो, या महाशयांनी वरिष्ठांना अर्ज करताना लग्नाचा वाढदिवसासाठी सुट्टी म्हटलं खरं पण लग्नाचा वाढदिवसाच्या पुढे कंस करत त्यात  'पश्चाताप दिन' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  लग्नाचा लाडू खाऊन या पोलीस महाशयांना किती त्रास होतोय हे स्पष्ट दिसतंय.

 नेमकं काय आहे प्रकरण? 

सदर पोलीस कर्मचाऱ्याचा 29 मार्च रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यासाठी त्यांनी त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मागितली. या सुट्टीसाठी त्यांनी वरिष्ठांना अर्ज केला. या पोलीस कर्मचाऱ्याला 27 मार्चला साप्ताहिक सुट्टी देण्यात आली होती. मात्र 29 मार्चला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यानं त्यांनी सुट्टीचा दिवस बदलण्याची मागणी करणारा अर्ज वरिष्ठांना केला होता. सुट्टीचा दिवस बदलण्याचा उल्लेख त्यांनी अर्जात केला आहे. परंतु लग्नाचा वाढदिवस म्हणताना, त्यांनी त्याला पश्चाताप दिन असं म्हटलं आहे. त्यामुळेच हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

दरम्यान पोलीस साहेबांनी आपल्या वरिष्ठांना तसं लिहून दिलं त्यात पश्चाताप दिन म्हटलं ते ठीक. कारण ते त्यांच्यापुरतीच मर्यादित गोष्ट होती. परंतु आता हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे त्याची होम मिनिस्टर त्याचं घरी काय करेल याची कल्पना सुद्धा करणं अवघड आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी