PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी

Polling Officer Reena Dwivedi: लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर चर्चेत असलेली निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी ही आता पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

polling officer reena dwivedi photos again viral on social media 
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत मतदारांसोबत सेल्फी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • लोकसभा निवडणुकीत चर्चेत आलेली निवडणूक अधिकारीचे फोटो झाले पुन्हा व्हायरल
  • विधानसभा पोटनिवडणुकीत देखील रीना होती निवडणूक अधिकारी
  • निवडणुकीदरम्यान गुलाबी साडीत दिसली रीना द्विवेदी

लखनौ: लोकसभा निवडणुकीत पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी रीना द्विवेदी ही आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसोबतच अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील आज घेण्यात आल्या. ज्यामध्ये उत्तरप्रदेशचा देखील समावेश आहे. सोमवारी उत्तरप्रदेशमधील कैंट विधानसभा पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान घेण्यात आलं. याच दरम्यान, रीना द्विवेदी ही लखनऊच्या कृष्णानगर येथील इंटर कॉलेजमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून तैनात होती. 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कल के चुनाव की तैयारी मे टीम के साथ ?????

A post shared by Reena Dwivedi (@dwivedi_reena1987) on

 

या मतदान केंद्रावर बरीच गर्दी होती. आपल्या ड्यूटीदरम्यान रीना द्विवेदी ही आज गुलाबी रंगाच्या साडीत दिसून आली. मतदानासाठी आलेल्या अनेकांनी तिच्यासोबत सेल्फी देखील घेतले. यावेळी तिने देखील कुणालाच नाराज केलं नाही. सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असलेली रीना हिने मतदानाआधी लोकांसोबतचे आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कल के चुनाव की तैयारी मे टीम के साथ ?????

A post shared by Reena Dwivedi (@dwivedi_reena1987) on

 

कोण आहे रिना? 

उत्तरप्रदेशमधील देवरिया येथे राहणारी रीना द्विवेदी ही पीडब्ल्यूडी खात्यात यूडीसी पदावर कार्यरत आहे. रीना ही टिक-टॉकवर देखील खूप अॅक्टिव्ह असते आणि तिचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीदरम्यान तिचे पिवळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. रीनाच्या मते तिच्या स्टाइल स्टेंटमेंटमुळेच तिला नवी ओळख मिळाली आहे. 

 

 

रीनाला फिरायला खूप आवडतं. त्यामुळे ती बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाते. यावेळी ती तेथील तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील करते. हरियाणवी गाण्यावरील तिचा डान्सचा व्हिडिओ देखील खूपच व्हायरल झाला होता. 

 

 

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ११ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्यात आल्या. या सर्व मतदारसंघात मिळून एकूण ४७.०५ टक्के मतदान झालं आहे. लखनौच्या कैंट मतदारसंघात भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी या आमदार होत्या पण लोकसभा निवडणुकीत त्या खासदार म्हणून निवडून आल्या. तेव्हापासून या मतदारसंघात आमदार नव्हता. त्यामुळे या मतदारसंघात आज पोटनिवडणूक घेण्यात आली. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी