“Mars Edition” tomato ketchup : मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप तयार

Mars Edition” tomato ketchup : मंगळ ग्रहावरच्या (Mars) मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप तयार करण्यात मानवाला यश आले आहे. यामुळे पृथ्वीवरील लोकांना लवकरच मंगळवरील शेतातील टोमॉटोंचं कॅचअप खायाला मिळणार आहे.

Prepare ketchup from tomatoes grown in the soil of Mars
पृथ्वीवरील लोकांना मिळणार मंगळावरील टोमॅटोचं कॅचअप   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मार्स एडिशन’ टोमॅटो केचपची चव साधारण टोमॅटो केचपपेक्षा वेगळी.
  • हेन्झमधील टोमॅटो मास्टर्सने मंगळावर भविष्यात जाणारे लोक त्या ग्रहाच्या मातीत टोमॅटो पिकवू शकतील का याच शोध घेत आहे.
  • अमेरिकन फूड कंपनी हेन्झने (Heinz) मंगळ ग्रहाच्या मातीतील टोमॉटोचं कॅचअप तयार केलं.

Mars Edition” tomato ketchup : मंगळ ग्रहावरच्या (Mars) मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप तयार करण्यात मानवाला यश आले आहे. यामुळे पृथ्वीवरील लोकांना लवकरच मंगळवरील शेतातील टोमॉटोंचं कॅचअप खायाला मिळणार आहे. अमेरिकन फूड कंपनी हेन्झने (Heinz) मंगळ ग्रहाच्या मातीत पिकवलेल्या टोमॅटोपासून नवीन ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचप तयार केले आहे. मानवाने मंगळावर राहण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा प्रयोग करण्यात आला आहे. 

टोमॅटो पिकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानचा शोध

मंगळावर पृथ्वीपवर असलेल्या माती सारखी माती नाही. मंगळाची माती पिकांसाठी कठोर आहे. मंगळ ग्रहावरची माती मार्टियन रेगोलिथ म्हणून ओळखली जाते. त्या मातीत सेंद्रिय पदार्थ नसतात. याशिवाय मंगळावर सूर्यप्रकाशही कमी पोहोचतो. यामुळे, टोमॅटो पिकवणाऱ्या टीमने टोमॉटो पीक वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधून त्याचा वापर केला आणि त्यांना यश आले. मानवाने मंगळावर राहण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा प्रयोग केला आहे. एक दिवस माणसानी मंगळावर स्वतःशेती करावी या दिशेने काम करणाऱ्या टीमने मंगळ ग्रहासारखे हरितगृह वातावरण तयार केले आणि मंगळासारखीच माती वापरली. त्यांनी या पद्धतीने टोमॅटो उगवले आणि नंतर हेन्झने त्या टोमॅटोंचे केचअप तयार केले आहे.

मंगळावर कॅचअप तयार करणं शक्य आहे का? 

हेन्झने तयार केलेल्या ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचपची चव साधारण टोमॅटो केचपपेक्षा वेगळी असल्याचे त्यात म्हटले जात आहे. हेन्झने मार्स व्हर्जन केचपची बाटलीही अंतराळातपण पाठवली होती, जिथे ही बाटली -94 अंश तापमानात होती. हेन्झमधील टोमॅटो मास्टर्सने मंगळावर भविष्यात जाणारे लोक त्या ग्रहाच्या मातीत टोमॅटो पिकवू शकतील का, त्याचं केचप बनवू शकतील की नाही हे शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी उत्तम बियाणे घेण्यात आले आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची वाढ करण्यात आली.

हे टोमॅटो तयार करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरील वातावरणातील बदलामुळे शेती करणे कठीण होत चाललय. अशा प्रकारे पृथ्वीवरही शेती करणे शक्य आहे. नासाचे माजी अंतराळवीर माईक मॅसिमिनो म्हणाले की, घरापासून (पृथ्वीपासून) ईतके दूरवर पिकवलेल्याली चव परिचयाची असणे हे मानवाच्या कल्याणासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी