Priya Prakash Varrier डोळा मारून लोकप्रिय झालेली प्रिया प्रकाश वारियर नव्या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत

Priya Prakash Varrier New Viral Video सिनेमातील एका दृश्यात बॉयफ्रेंडला डोळा मारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर नव्या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आहे.

Priya Prakash Varrier New Viral Video
डोळा मारून लोकप्रिय झालेली प्रिया प्रकाश वारियर नव्या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत 
थोडं पण कामाचं
  • डोळा मारून लोकप्रिय झालेली प्रिया प्रकाश वारियर नव्या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत
  • 'विंक गर्ल' नावाने लोकप्रिय असलेली प्रिया प्रकाश वारियर ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री
  • प्रियाने तिचा ताजा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला

Priya Prakash Varrier New Viral Video । नवी दिल्ली: सिनेमातील एका दृश्यात बॉयफ्रेंडला डोळा मारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर नव्या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आहे. 'विंक गर्ल' नावाने लोकप्रिय असलेली प्रिया प्रकाश वारियर ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रियाने तिचा ताजा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

इन्स्टाग्रामवर प्रिया प्रकाश वारियरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती रशियात वेगवेगळ्या ठिकाणी साडी नेसून नृत्य करताना आणि दिलखेचक अदा करताना दिसत आहे. याआधीही प्रियाचा मैत्रीणीसोबत नृत्य करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर आला होता. तो व्हिडीओ पण व्हायरल झाला आहे. 

प्रियाने यावेळी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केले आहे. यात रेड ब्लाउझ आणि क्रीम कलरची साडी नेसलेली प्रिया दिसत आहे. परंपरागत कपड्यांमध्ये दिसत असलेली प्रिया रशियात नृत्य करताना दिसत आहे. या नृत्यासाठी बॅकग्राउंडला मल्याळी गाण्याचा वापर केला आहे. रीलला प्रियाने आपल्यातील मल्याळी व्यक्ती जागी करण्यासाठी.... अशा स्वरुपाची कॅप्शन दिली आहे. 

प्रियाचे रील १८ लाखांपेक्षा जास्त वेळा बघितले गेले आहे. या रीलला साडेनऊ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. प्रियाच्या असंख्य चाहत्यांनी रील पाहून तिचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी