पुलवामा हल्ल्यातील शहीद विभूति शंकर यांची पत्नी नितिका बनली ऑर्मी ऑफिसर, लोकांनी शुभेच्छांसह जबरदस्त कॉमेंट्स

व्हायरल झालं जी
Updated May 31, 2021 | 13:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

पुलवामा हल्ल्यातील मेजर विभूति शंकर धौंडियाल यांची वीरपत्नी नितिका कौल धौंडियाल भारतीय लष्करात दाखल झाली आहे. हल्ला होण्याच्या नऊ महिने आधीच शहीद मेजर विभूति यांचे नितिकाशी लग्न झाले होते.

Nikita kaul joined Indian Army
नितिका लष्करात अधिकारी म्हणून दाखल  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • धीरोदात्त नितिका धौंडियाल
  • हल्ला होण्याच्या नऊ महिने आधीच लग्न
  • नितिका लष्करात अधिकारी म्हणून दाखल

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा काश्मीरमधील पुलवामा (Pulwama attack) येथे झालेला दहशतवादी हल्ला प्रत्येक भारतीयांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. २०१९मध्ये सीआरपीएफच्या जवानांच्या (CRPF Jawan) तुकडीवर झालेला हा भीषण हल्ला सर्वांनाच सुन्न करून गेला होता. अवघा देश या हल्ल्याने हादरून गेला होता. भारतीय सेनेने (Indian Army)त्यानंतर वेगाने दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरू करत त्या हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांच्या (Terrorists) खातमा केला होता. २०१९मध्ये भारतीय सेनेचे जवान आणि दहशतवादी यांच्यात काही जबरदस्त चकमकी झाल्या होत्या. त्यातील एका चकमकीत देशाचे पाच जवान शहीद (Martyr Jawan) झाले होते. यामध्ये मेजर विभूति शंकर धौंडियाल (major Vibhuti Shankar Dhoundiyal ) यांचा समावेश होता. हा हल्ला होण्यापूर्वी बरोबर नऊ महिने आधीच शहीद विभूति शंकर धौंडियाल यांचे नितिकाशी (Nikita kaul) लग्न झाले होते. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूति शंकर धौंडियाल यांची वीरपत्नी नितिका कौल धौंडियाल (Nikita kaul) (wife of major Vibhuti Shankar Dhoundiyal martyred in Pulwama attack) हिने धैर्य आणि हिंमत दाखवत आर्मी जॉईन केली आहे. शनिवारी नितिका भारतीय सेनेत दाखल झाली. (Pulwama Attack : Nikita kaul joined Indian Army who is wife of Major Vibhuti Shankar Dhoundiyal martyred in Pulwama attack.)
 
धीरोदात्त नितिका धौंडियाल (Nikita kaul)


नितिका धौंडियाल लष्करात दाखल झाल्याची बातमी आल्याबरोबर सोशल मीडियावर यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नितिकाचे फोटो शेअर करत नेटिझन्स तिला शुभेच्छा देत आहेत. लोक नितिकाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत. इतकेच नाही तर नितिकाचे जुने फोटो शेअर करत लोक भावनाविवशदेखील होत आहेत. आपले पती मेजर विभूति शंकर धौंडियाल दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्यानंतर नितिका मोठ्या धैर्याने आणि संयमाने त्या हादरवून टाकणाऱ्या आणि तिच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगाला सामोरी गेली होती. 

नऊ महिन्याआधीच झाले होते लग्न


२०१९मध्ये पुलवामा येथे भारतीय सेनेचे जवान आणि दहशतवादी यांच्या जबरदस्त चकमक झाली होती. या हल्ल्यात देशाचे पाच जवान शहीद झाले होते. यामध्ये मेजर विभूति शंकर धौंडियाल यांचादेखील समावेश होता. यातील दुर्दैवी बाब म्हणजे मेजर विभूति यांच्या लग्नाला फक्त नऊ महिनेच झाले होते. हल्ल्याच्या बरोबर नऊ महिने आधीच मेजर विभूति यांचे नितिकाशी लग्न झाले होते. शहीद मेजर विभूति शंकर धौंडियाल यांना मरणोपरांत शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते. जेव्हा शहीद मेजर विभूति शंकर धौंडियाल यांचे पार्थिव शरीर त्यांच्या गावी पोचले त्यावेळचे नितिकाचे फोटोदेखील खूप व्हायरल झाले होते. आता नितिका भारतीय लष्करात अधिकारी म्हणून दाखल झाल्यावरदेखील नितिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक नितिकाचे प्रचंड कौतुक करत आहेत. शहीद मेजर विभूति शंकर धौंडियाल यांना हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मत लोक व्यक्त करत आहेत.

नितिका लष्करात अधिकारी म्हणून दाखल


शहीद मेजर विभूति शंकर धौंडियाल यांच्या मृत्यूनंतर आपल्या पतीच्या शौर्यातून प्रेरणा घेत नितिका कौलने लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. याआधी नितिका कौल मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांचे उत्तम असे करियर होते. मात्र तरीही त्यांनी भारतीय लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. नितिकाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन पास केल्यानंतर मागील वर्षीच आपली ट्रेनिंग सुरू केली होती. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर नितिका भारतीय लष्करात अधिकारी म्हणून दाखल झाली आहे. नितिका सैन्यात दाखल झाल्यावर तिचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. नितिकावर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे. युजर्स आपल्या पद्धतीने तिचे कौतुक करत आहेत. कोणी फोटो शेअर करतो आहे तर कोणी अभिमान व्यक्त करतो आहे. लोकांनी व्यक्त केलेल्या कॉमेंट्स पाहूया.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी