Pune News : पुण्यात बसचालक आणि दुचाकीस्वारांमध्ये राडा, ओव्हरटेक केल्याचा राग

Pune News : पुण्यात पीएमपीएल बस चालक आणि दुचाकीस्वारांमध्ये राडा झाला आहे. ओव्हरटेक केल्याच्या रागावरून दोन दुचाकीस्वार आणि दोन बसचालक यांची भर रस्त्यात जबर हाणामारी झाली. दुचाकीस्वार आणि बसचालकांचा राडा झाल्यानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान या राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

pmpl bus driver and bike rider fight
पुण्यात बसचालक आणि दुचाकीस्वारांमध्ये राडा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुण्यात पीएमपीएल बस चालक आणि दुचाकीस्वारांमध्ये राडा झाला आहे.
  • ओव्हरटेक केल्याच्या रागावरून दोन दुचाकीस्वार आणि दोन बसचालक यांची भर रस्त्यात जबर हाणामारी झाली.
  • या राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune News : पुणे : पुण्यात पीएमपीएल बस चालक आणि दुचाकीस्वारांमध्ये राडा झाला आहे. ओव्हरटेक केल्याच्या रागावरून दोन दुचाकीस्वार आणि दोन बसचालक यांची भर रस्त्यात जबर हाणामारी झाली. दुचाकीस्वार आणि बसचालकांचा राडा झाल्यानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान या राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.- (pune pmpl bus driver and bike rider rucks on road video gone viral )

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्थानकात तक्रारही दाखल झाली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. बसचालकाला मारहाण झाल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी बसचालकाने दुचाकी बाजूला लावण्यास सांगितले. त्यावरून या दुचाकीस्वाराने बसचालकाला मारहाण केली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक करून जेरबंद केले आहे. 

अधिक वाचा : तक्रारदार महिला राज्य महिला आयोगाकडे जाणार, Jitendra Awhad यांच्या अडचणी वाढणार?

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी