Love Affair: बंद खोलीत प्रियकरासोबत होती महिला, बाहेर पती पाहत होता वाट, मग पुढे असे घडले 

Crime News: अमृतसरमध्ये एका महिलेला आपल्या नवऱ्याला फसवणे महागात पडले.  ती तिच्या प्रियकरासमवेत हॉटेलमध्ये पोहोचली, पण पुढच्या क्षणी तिच्या या फसवणुकीवर पाणी फिरले. 

Punjab Husband beat up his wife after seeing her with her boyfriend
Love Affair: बंद खोलीत प्रियकरासोबत होती महिला, बाहेर पती  

थोडं पण कामाचं

  • समजा जर एखादी विवाहित महिला आपल्या प्रियकरासह हॉटेलमध्ये गेली असेल आणि तिचा नवरा हॉटेलच्या खोलीबाहेर वाट पाहत असेल तर पुढे काय होईल याचा अंदाज तुम्ही नक्की लावू शकतात.
  • या महिलेचे आपल्या पतीशी घटस्फोट घेण्यासंदर्भात खटला सुरू आहे.
  • महिलेचा नवरा पोलिस हवालदार आणि महिलेचा प्रियकर एसजीपीसीमध्ये काम करतो.

अमृतसर  :  समजा जर एखादी विवाहित महिला आपल्या प्रियकरासह हॉटेलमध्ये गेली असेल आणि तिचा नवरा हॉटेलच्या खोलीबाहेर वाट पाहत असेल तर पुढे काय होईल याचा अंदाज तुम्ही नक्की लावू शकतात.  याची दोन उत्तरे असू शकतात, एकतर पती काहीच बोलणार नाही किंवा जो काही राडा होईल तो आपण विचारही करू शकत नाही.  अमृतसरमधील एका व्यक्तीच्या बाबतीतही असेच घडले. एक महिला आपल्या प्रियकरासह हॉटेलमध्ये येते, परंतु पुढच्या क्षणाला ती मोठ्या अडचणीत फसेल याचा अंदाजही तिला नसतो.  नवऱ्याने आपल्या बायकोला तिच्या प्रियकराबरोबर पाहिले तेव्हा लाथाबुक्क्यांचा पाऊस सुरू झाला. . कदाचित हे प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले नसते तर जगासमोर ही बाब आली नसती.  (Punjab Husband beat up his wife after seeing her with her boyfriend) 

घटस्फोटाचा सुरू  होता खटला

आता संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे समजून घेणे आवश्यक आहे. वास्तविक, या महिलेचे आपल्या पतीशी घटस्फोट घेण्यासंदर्भात खटला सुरू आहे.  एका बाजूला तिने पतीकडून पैसे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पण दुसरीकडे घटस्फोट देण्यापासून नकार देत आहे.  दरम्यान, या महिलेच्या नवऱ्याला कोठूनही समजले की तो आपल्या प्रियकराबरोबर खासगी हॉटेलमध्ये आहे, त्यानंतर त्याने मित्रांसह हॉटेल गाठले आणि पत्नीला मारहाण केली. 

मोबाईलवर बोलल्याने संशय वाढला

महिलेचा नवरा पोलिस हवालदार आणि महिलेचा प्रियकर एसजीपीसीमध्ये काम करतो. आपल्या पत्नीचा कोणाशी तरी प्रेमसंबंध होता आणि ती आपली फसवणूक करत असल्याचा आरोप नवऱ्याने केला.

कॉन्स्टेबल नवरा म्हणतो की त्याची पत्नी नेहमीच त्याच्याशी भांडत होती. क्षुल्लक गोष्टींवरून भांडणे हा तिचा स्वभाव होता. बर्‍याच वेळा त्यांच्यात समेट झाली. पण तिचे वागणे तसेच सुरू होते.  काही महिन्यांनंतर त्याला त्याच्या पत्नीच्या वागण्यात बदल दिसला. ती फोनवर बोलतच राहिली आणि तिथून तिला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. (Punjab Husband beat up his wife after seeing her with her boyfriend)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी