माणसाच्या तोंडाप्रमाणे दिसते ही कॉईन पर्स...Video व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Jun 06, 2019 | 17:16 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

सोशल मीडियावर माणसाच्या तोंडाप्रमाणे दिसणाऱ्या एका पर्सचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १३ मिलियन लोकांनी पाहिला आहे. ५४ सेकंदाच्या या व्हिडिओला अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

mouth purse
तोंडाच्या आकाराची पर्स  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: देश बदलत आहे. समाजात सातत्याने बदल होत आहेत. यातच सध्याच्या आधुनिक युगामुळे नवनव्या गोष्टी विकसित होत आहेत. दरम्यान लोकांची अशी धारणा असते की पैसा काही देव नाही आहे मात्र त्याहूनही कमी नाही. मात्र पैशाशिवाय सर्वच कामे रेंगाळतात. हाच पैसा ठेवण्यासाठी पुरुष आणि महिला पर्सचा वापर करतात. आता नवनव्या गोष्टी विकसित होत आहेत. त्यासोबतच पर्सचे रंग रूप तसेच कलरही. 

मात्र, तुम्ही कधी माणसाच्या तोंडाच्या आकारची पर्स पाहिली आहे का ज्यात तुम्ही निश्चिंत होऊन पैसे ठेवू शकता. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले ना? मात्र ही बाब खरी आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर लोकांचे लक्ष जात आहे. ट्विटरवर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 


हा ५४ सेकंदाचा व्हिडिओ आतापर्यंत १३ लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये एक पर्स आहे जी माणसाच्या तोंडाच्या आकाराची तसेच तशीच दिसते. यात दात, हिरड्या आणि एक जीभही आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांच्या विविध कमेंट येत आहेत. 

अनेकांनी या व्हिडिओबाबत ट्वीट केले आहे. एका युझरने म्हटले, मला हे पाहून कसेतरीच वाटत आहे. तर दुसऱ्या युजरने ट्विटरवर म्हटले की हे हैराण करणारे आहे. आणखी एका युझरनेही अशीच काहीशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही पर्स तुम्ही कॉईनसाठी वापरू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
माणसाच्या तोंडाप्रमाणे दिसते ही कॉईन पर्स...Video व्हायरल Description: सोशल मीडियावर माणसाच्या तोंडाप्रमाणे दिसणाऱ्या एका पर्सचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १३ मिलियन लोकांनी पाहिला आहे. ५४ सेकंदाच्या या व्हिडिओला अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola