Pushpa Movie: "पुष्पा राज अपुन लिखेगा नही साला', १० वीच्या विद्यार्थ्याने चक्क उत्तरपत्रिकेत लिहला डायलॉग 

व्हायरल झालं जी
Updated Apr 05, 2022 | 18:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pushpa Movie Dialogue | जेव्हा पासून 'द पुष्पा राइस' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून यातील गाण्याने आणि डायलॉगने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, यातील गाण्यावर आणि डायलॉगवर तरूणाई ठेका धरताना दिसून आली. बहुतांश लोक या चित्रपटातील गाण्यावर डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

१० वीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत लिहला 'पुष्पा' तील डायलॉग   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • द पुष्पा राइस' हा चित्रपट खूप प्रसिध्द झाला आहे.
  • या चित्रपटातील डायलॉगचा परिणाम दहावीची परीक्षा देत असलेल्या एका विद्यार्थ्यावर झालेला पाहायला मिळाला.
  • पुष्पा राज अपुन लिखेगा नही साला' १० वीच्या विद्यार्थ्याने चक्क उत्तरपत्रिकेत डायलॉग लिहला.

Pushpa Movie Dialogue | मुंबई : जेव्हा पासून 'द पुष्पा राइस' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून यातील गाण्याने आणि डायलॉगने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, यातील गाण्यावर आणि डायलॉगवर तरूणाई ठेका धरताना दिसून आली. बहुतांश लोक या चित्रपटातील गाण्यावर डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे या चित्रपटातील डायलॉग "मै झुकेगा नही' खूपच प्रसिध्द झाला आहे. मात्र पडद्यावर गाजलेल्या या चित्रपटाचे पडसाद खऱ्या जीवनशैलीवर देखील दिसून येत आहेत. ("Pushpa Raj Apun Likhega Nahi Sala" Dialogue written by a 10th standard student on board exam). 

अधिक वाचा : कंगनाने ऑस्कर-ग्रॅमी पुरस्काराची उडवली खिल्ली

दरम्यान, नुकतीच दहावीची बोर्ड परीक्षा संपली आहे, मात्र या चित्रपटातील डायलॉगचा परिणाम दहावीची परीक्षा (West Bengal Madhyamika Examination) देत असलेल्या एका विद्यार्थ्यावर झालेला पाहायला मिळाला. एका विद्यार्थ्याने संपूर्ण उत्तरपत्रिकेत मै झुकेगा नही, 'पुष्पा राज आपन लिखेगा नही' या डायलॉगच्या ओळी त्याने लिहल्या. हे पाहून शिक्षक देखील थक्क झाले असून हे खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, राज्य माध्यमिक परीक्षा संपून काही दिवस झाले आहेत. आता परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीची वेळ आली आहे. त्यांचे मूल्यमापन सुरू आहे. 

"पुष्पा राज अपुन लिखेगा नही साला'

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा डायलॉग पुष्पाराज खूप प्रसिध्द झाला आहे, मात्र १० वीच्या परीक्षेमध्ये देखील याचा परिणाम दिसून आला आहे. विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या संपूर्ण पानांवर "पुष्पा राज अपुन लिखेगा नही साला' असे लिहले. मात्र हा सर्वकाही या चित्रपटाचा परिणाम असल्याचे दिसून येत आहे कारण त्या संबंधित विद्यार्थ्याचे म्हणणे स्पष्ट आहे की कोणतेच उत्तर लिहणार नाही. 

Viral News

सोशल मीडियावर पुष्पा चित्रपटातील डायलॉगची चर्चा 

साउथचा सुपरस्टार असलेला अल्लू अर्जुनचा हा चित्रपट फक्त दक्षिण भारतात मर्यादित राहिला नाही संपूर्ण देशभर या चित्रपटाचे वेड लागले होते. कारण या चित्रपटाला अनेक भाषांमध्ये दाखवण्यात आले. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटावे दक्षिण भारतासोबतच इतर भागांतून देखील भरपूर कमाई केली. चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी मिळवलेल्या प्रसिध्दीमुळे विदेशात देखील चित्रपटाने चांगलीच कमाई केली. कित्येक विदेशी लोकांनी, कलाकारांनी आणि खेळाडूंनी या चित्रपटाच्या डायलॉगवर व्हिडिओ बनवल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी