Chimpanzee Dance : अभिनेता (Actor) अल्लू अर्जन (Allu Arjan) आणि अभिनेत्री (Actress)रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा' चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये धुमाकूळ घातला निर्माण झाली आहे. या चित्रपटाने अप्रतिम व्यवसाय करत अभिनेता अल्लू अर्जुनची ओळख राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय झाली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांवर लोकं जोरदार रील्स बनवत असून ते सोशल मीडियावर (social media) शेअर करत आहेत.
आता प्राण्यांवरही चढला श्रीवल्लीचा रंग
'पुष्पा चित्रपटातील 'श्रीवल्ली' या गाण्याची वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. या गाण्यावर लोकांनी जबरदस्त व्हिडिओ बनवले आणि सोशल मीडियावर शेअर केले आणि लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. आता या गाण्याचा रंग चिंपांझीवर चढला असून चिंपांझीने 'श्रीवल्ली' या गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडिया यूजर्सना आश्चर्यचकित केले आहे. चिंपांझीचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, 'श्रीवल्ली' गाण्यावर चिंपांझी अल्लू अर्जुनच्या स्टाईलला कॉपी करताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की, त्याला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. dinesh_adhi नावाच्या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. व्हिडिओ पहा-
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक चिंपांझी प्राणीसंग्रहालयात फिरत आहे, तेव्हाच श्रीवल्ली हे गाणे तेथे वाजण्यास सुरुवात होते. यानंतर चिंपांझी अल्लू अर्जुनची स्टाईल कॉपी करू लागतो आणि या गाण्यात नाचू लागतो. अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये चालताना चिंपांझी उभा राहून नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू फुटेल.