कोलकात्यातील पुरूष नेसतो साडी, लावतो लाल लिप्स्टिक, नेटिझन्स त्याला म्हणतात 'आकर्षक'

व्हायरल झालं जी
Updated Apr 20, 2021 | 15:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pushpak sen : फोटोतील व्यक्तीचे नाव पुष्पक सेन असे आहे. सोशल मीडियावर त्याच्या फोटोंनी नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

Pushpak sen's photo in saree went viral, users gave love to him
साडी आणि लिप्स्टिक मधील पुष्पक सेनवर सोशल मीडिया फिदा 

थोडं पण कामाचं

  • अॅंड्रोगायनस स्टाईलचा जमाना
  • पुष्पक सेनचे फोटो व्हायरल
  • सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

Pushpak sen : कोलकाता : पुरूष किंवा स्त्री यांचे पारंपारिक स्टाईलचे कपडे परिधान न करता, ज्यातून लिंगभेद कळत नाही असे कपडे घालण्याची फॅशन सध्या कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली आहे. याला अॅंड्रोगायनस स्टाईल (Androgynous style) असे म्हणतात. एरवी पुरूषांनी घालायचे कपडे आणि महिलांसाठीचे कपडे असा स्पष्ट फरक असतो. आता मात्र लिंगावर आधारित कपडे घालण्याचा जमाना गेला आहे. किंबहुना ज्या कपड्यांनी किंवा स्टाईलने लिंगभेद करता येत नाही अशा कपड्यांची फॅशन सध्या लोकप्रिय होते आहे.

(Image Credits: Facebook)

जगभरातील ट्रेंड

मागील वर्षी गायक हॅरी स्टाईल्सने आपल्या ड्रेस आणि स्कर्टने इंटरनेटवर धमाल उडवून दिली होती. प्रत्येक व्यक्तीला त्याला आवडेल तसे व्यक्त होण्याची किंवा कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे ही बाब लोक हळूहळू स्वीकारू लागले आहेत. एखाद्या महिलेने पुरूषी कपडे घातले किंवा पुरूषाने साडी नेसली तर त्या बाबीला स्वीकारले पाहिजे अशी मतधारणा आता हळूहळू तयार होते आहे.

(Image Credits: Facebook)

पुष्पक सेनचा नवा अवतार

कोलकात्यातील पुष्पक सेन नावाच्या पुरूषाने आपल्या नव्या अवताराने इंटरनेटवर सध्या धमाल उडवून दिली आहे. त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. काळ्या आणि हिरव्या रंगाच्या सुंदर साडी नेसल्याचे आपले तीन फोटो त्याने फेसबुकवर पोस्ट केले आहेत. याशिवाय त्याच्या मेकअपमध्ये परफेक्ट कॅट-आय स्टाईल आयलाईनर आणि क्लासिक लाल रंगाच्या लिप्स्टिकचा देखील वापर केलेला आहे. 


फेसबुकवर  बोल्ड कॅप्शन

'सहज साडी नेसली आहे, स्वत:ला मेक अप केला आहे, फोटो क्लिक केले आणि साडीतील फोटोशूटनंतरदेखील माझ्यात लिंगभेद झालेला नव्हता, मी योग्य त्या स्थितितच होतो', असे कॅप्शन पुष्पक सेनने आपल्या फेसबुकच्या फोटोला दिले आहे. यातील एका फोटोमध्ये तो आकर्षक दिसतो आहे. त्याच्या फोटोला वेगवेगळ्या शेड्सदेखील आहेत. पुष्पक सेनचे हे फेसबुकवरील फोटो व्हायरल झाले आहेत.  फक्त फेसबुकवर नव्हे तर पुष्पक सेनच्या या फोटोंनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील धमाल उडवली आहे.

युजरच्या प्रतिक्रिया

पुष्पक सेनच्या या नव्या लुकने नेटिझन्सना खरतरं गोंधळातच टाकले आहे. नेटिझन्स त्याच्या या स्टाईलचे कौतुक करत आहेत, शिवाय पुष्पकला अनेकांकडून प्रेमळ कॉमेंटदेखील मिळत आहेत. भुवया उंचावणारा दिवस अशी प्रतिक्रिया एका नेटिझनने दिली आहे. तर अनेकांनी पुष्पक सेनला आकर्षक आणि सुंदर अशा उपमा बहाल केल्या आहेत.

एका युजरने पुष्पकच्या सारी नेसण्याच्या कौशल्यावर, मीसुद्धा इतकी व्यवस्थित साडी नेसू शकलो नसतो, असे कौतुक केले आहे. आपल्या या नव्या अवताराने पुष्पक सेनने सोशल मीडियावर धमाका केला आहे.

आपल्या स्टाईलमुळे किंवा विशिष्ट कृतीने किंवा आकर्षक फोटोंमुळे अनेकजळ सोशल मीडियाचे लक्ष स्वत:कडे वेधून घेत असतात. अनेक अभिनेत्री किंवा मॉडेलचे बोल्ड, मादक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंवर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतो. नेटिझन्स त्यावर खुलके व्यक्त होत असतात.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी