Viral Video: अबब! १८ फुटांचा अजगर घराच्या छतावर

व्हायरल झालं जी
Updated Apr 20, 2019 | 18:39 IST | Times Now

डेट्रॉईटमधील एका घराच्या छतावर १८ फुट लांबीचा अजगर कुतूहलाचा विषय ठरला आहे. हा अजगर पाहिल्यानंतर तेथील लोकांनी त्याचे फोटो तसेच व्हिडिओ काढण्यास सुरूवात केली.

snake
अजगर  |  फोटो सौजन्य: Facebook

वॉशिंग्टन: डेट्रॉईटमधील एका घराच्या छतावर १८ फुट लांबीचा अजगर कुतूहलाचा विषय ठरला आहे. हा अजगर पाहिल्यानंतर तेथील लोकांनी त्याचे फोटो तसेच व्हिडिओ काढण्यास सुरूवात केली. ज्युलियट नावाचा हा अजगर इतका मोठा होता की तो त्याच्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याला तो सहज गिळू शकला असता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

मात्र, त्या अजगराला कुत्र्याशी लढण्याच्या ऐवजी सुरक्षेसाठी गॅरेजच्या छतावर चढणे योग्य वाटले. इतका मोठा अजगर पाहिल्यानंतर डेट्रॉईट मधील व्यक्ती खूपच आश्चर्यचकित झाले असून ते सतत व्हिडिओ आणि फोटोज काढत आहेत. हा इतका मोठा अजगर छतावर पोहोचलाच कसा असा प्रश्न सारेच विचारत आहेत. 

या गॅरेजच्या शेजारील व्यक्ती लोटोंडा हार्वे यांनी या घटनेचे फेसबुक लाईव्ह केलं आहे. त्यात ते म्हणत आहेत, अरे देवा, हा साप हलत आहे आणि इतका मोठा साप आहे. यादरम्यान एका व्यक्तीने पोलिसांना या छतावरील महाकाय अजगराची माहिती दिली आहे. पोलीस तेथे पोहोचल्यावर एका शेजारच्या व्यक्तीने आश्चर्य व्यक्त केले की, या प्रकरणात पोलीस अधिकारी  येऊन काय करणार आहेत?

या जातीतील अजगर दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळतात. हे बिनविषारी साप असून ते जगातील सर्वात लांब साप असतात. ज्युलियटचा २५ वर्षीय मालक डेविड जोन्स वाइटने दिलेल्या माहितीनुसार, हा अजगर तब्बल १८ फूट लांब आहे. दरम्यान, लोकांच्या चिंतेचे कारण मी समजू शकतो. मात्र पोलिसांना तेथे पाहून मी घाबरलो की ते त्याला दुखापत तर पोहोवणार नाही ना?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Viral Video: अबब! १८ फुटांचा अजगर घराच्या छतावर Description: डेट्रॉईटमधील एका घराच्या छतावर १८ फुट लांबीचा अजगर कुतूहलाचा विषय ठरला आहे. हा अजगर पाहिल्यानंतर तेथील लोकांनी त्याचे फोटो तसेच व्हिडिओ काढण्यास सुरूवात केली.
Loading...
Loading...
Loading...