खुर्चीवर बसला होता अजगर, आयएफएस अधिकारी म्हणाले, ‘पाहा बैठक कोण घेत आहे?’

व्हायरल झालं जी
Updated Apr 24, 2021 | 13:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

खुर्चीवर बसलेल्या अजगराचा हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे, ‘पाहा कोण बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवते आहे, आपण यांना ओळखू शकता का?’

Python sitting in a chair
खुर्चीवर बसला होता अजगर, आयएफएस अधिकारी म्हणाले, ‘पाहा बैठक कोण घेत आहे?’  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला फोटो
  • फोटोतला अजगर भूषवत आहे बैठकीचे अध्यक्षपद
  • फोटो सोशल मीडियावर वेगाने होत आहे व्हायरल

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social media) अनेकदा प्राण्यांचे (animals) धोकादायक (dangerous) किंवा मजेदार फोटो (funny photos) आणि व्हिडिओ (videos) व्हायरल (viral) होत असतात. अनेकदा काही फोटो असेही असतात जे पाहून आपल्या हृदयाचा ठोका (heartbeat) चुकतो. तर काही फोटो असेही असतात जे पाहून आपल्याला हसू (laughter) आवरत नाही. सध्या असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत नाही जो भयंकर तर आहेच, पण ते पाहून लोकांनी ज्या प्रतिक्रिया (reactions) दिल्या आहेत त्या पाहून आपल्यालाही हसू येईल.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला फोटो

हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले आहे, ‘पाहा कोण सभेच्या अध्यक्षस्थानी बसले आहे. आपण या अध्यक्षांना ओळखता का?'

फोटोतला अजगर भूषवत आहे बैठकीचे अध्यक्षपद

या फोटोत आपल्याला दिसेल की एक लांबलचक अजगर एका खुर्चीवर मस्त पसरून बसलेला आहे. त्याला पाहून खरेच असे वाटत आहे की तो जणू एखाद्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाला आहे.

फोटो सोशल मीडियावर वेगाने होत आहे व्हायरल

या फोटोला आत्तापर्यंत ८०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोक हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत आणि या फोटोवर सतत अनेक मजेदार कॉमेंट्सही येत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी