Rabbit Fights Tiger | वाघ हा जंगलातील एक आकर्षक आणि धोकादायक प्राणी म्हणून ओळखला जातो. वाघ त्याच्या चपळाईसाठी, वेगासाठी आणि ताकदीसाठी ओळखला जातो. आपल्या टप्प्यात आलेलं सावज कसं गाठायचं आणि त्याची शिकार कशी करायची, याबाबत वाघाला निसर्गानं दिलेलं वरदान अभूतपूर्व आहे. अनेकदा शिकारीला जाताना वाघ त्याच्या पिल्लांनाही सोबत घेऊन जातो. आपली आई किंवा वडील कशा प्रकारे शिकार करतात, हे पिल्लं पाहतात आणि त्यांना शिकारीचे धडे मिळतात. लहान वयात वाघाची पिल्लं शिकारीसाठी तयार झालेली असतात. त्यामुळे चित्त्याच्या पिल्लांपासूनही सगळेच सावध राहतात. जंगलातील इतर प्राणी वाघ दिसला, तर मार्ग बदलून जाणं पसंत करतात. (Rabit wins over Tiger inspirational video goes viral on social media read in marathi)
व्हिडिओत एक छोटा वाघ सशाची शिकार करायला आल्याचं दिसतं. मात्र सशानं या हल्ल्याला दिलेलं उत्तर प्रेरणादायी आहे. आपल्यावर हल्ला करून पाहणाऱ्या वाघावर सशाने स्वतःच अशा प्रकारे हल्ले सुरू केले की त्याला कसं प्रत्युत्तर द्यावं, हेच त्या वाघाला समजेना. अटॅक इज बेस्ट डिफेन्स ही पॉलिसी वापरत सशाने आपले हल्ले सुरूच ठेवले. त्यामुळे वाघाला कुठलाच पवित्रा घेता आला नाही.
My strategy is to just attack, attack and attack .... pic.twitter.com/wMJRvebpHl — Dr.Samrat Gowda IFS (@IfsSamrat) July 1, 2022
आपल्यापेक्षा शक्तीशाली घटकाकडून हल्ला झाला की शक्यतो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. बरेचजण त्या शक्तीशी लढण्याऐवजी पराभव स्विकारतात. मात्र कितीही मोठी लढाई असली तरी ती लढल्याशिवाय पराभव मानायचा नाही, हा धडा या व्हिडिओत मिळत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. वाघापुढे सशाची ताकद म्हटलं तर काहीच नाही. मात्र तरीही आपल्या हिंमतीच्या जोरावर सशाने वाघाला चितपट करण्याचा चंग बांधला आणि सर्व ताकद एकवटून लढा दिला.
सशाने दिलेला हा लढा यशस्वी ठरला आणि वाघाने माघार घेतली. आपण ज्या प्राण्याची शिकार करायला आलो आहोत, त्याच प्राण्याने आपल्यावर उलटा हल्ला केल्याचं पाहून वाघ गांगरून गेला आणि त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. सशाने लागोपाठ आपला हल्ला सुरूच ठेवला आणि हा ससा काही आपल्या कह्यात येत नाही, हे पाहून वाघाने गपगुपान परतीची वाट धरली.
अधिक वाचा - "सत्ता मे आता हू, समझ मे नही" भाजपच्या मास्टर स्ट्रोकनंतर भन्नाट मीम्सचा पाऊस
हा व्हिडिओ Dr. Smarat Gowda या वनाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडिओला सध्या जोरदार हिट्स मिळत आहेत. प्रत्येक सामान्य माणसाला लढण्याची प्रेरणा देणारा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.