विश्वास नांगरे पाटलांनंतर राहुल गांधीचा ढोलक डान्स व्हायरल 

व्हायरल झालं जी
Updated Dec 27, 2019 | 19:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahul Gandhi Dance Video: राहुल गांधी छत्तीसगढमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवात सहभागी झाले. या दरम्यान त्यांनी स्थानिक कलाकारांसह डोलक डान्स केला. 

rahul gandhi performs traditional dance in raipur chhattisgarh with locals watch video vishwas nangre patil bala dance viral video in marathi google news
विश्वास नांगरे पाटलांनंतर राहुल गांधीचा ढोलक डान्स व्हायरल   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात नाशिकचे पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा बाला डान्स व्हायरल झाला होता.
  • आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा ढोलक नृत्याचा डान्स व्हायरल होत आहे.
  • दोन दिवसांपासून सुप्रसिद्ध व्यक्तींचे डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

रायपूर :  सध्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात आयपीएल अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा 'वेलकम ४' चित्रपटातील 'बाला' या गाण्यावरील डान्स व्हायरल होत आहे. आता या डान्सला राहुल गांधी यांच्या डान्सने मागे टाकले आहे. राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी स्थानिक कलाकारांसोबत डोलक डान्स करताना दिसले आहे. स्थानिकांसह पारंपारिक पोषकात ढोलकावर थाप देत, नृत्य करताना दिसत आहे. हे ढोलक त्यांनी गळ्यात अडकवले आहे. तर डोक्यावर पारंपारिक मुकूट परिधान केला आहे. अशी फूल्ल तयारी करून राहुल गांधी डान्स करताना दिसत आहेत. राहुल गांधींचा हा व्हिडिओ विश्वास नांगरे पाटील यांच्या बाला डान्सनंतर खूप व्हायरल होत आहे. 

राहुल गांधी यांनी या दरम्यान अर्थव्यवस्था आणि इतर मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा टार्गेट केले आहे. देशभरात संशोधित नागरिकता कायदा आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरू आहे. यात राहुल गांधी यांनी म्हटले की, भावाला भावापासून दूर करणे फायद्याचे नाही. सर्वांना साथ घेऊन पुढे जायला पाहिजे. लोकांना एकमेकांपासून तोडण्याची नाही तर जोडण्याची गरज आहे. 

शिस्तप्रिय अशी ओळख असलेले, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांचे नाव आदराने घेतले जाते. नेहमी अगदी ठराविक चौकटीत राहणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते चक्क हाऊलफुल-4 सिनेमातील ‘बाला’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये पाटील यांच्यासोबत त्यांचे मित्रही डान्स करताना दिसत आहेत. विश्वास नांगरे पाटील यांची आतापर्यंत डॅशिंग अशी प्रतिमा जनसामान्यांमध्ये होती, मात्र आता या व्हिडीओद्वारे त्यांचे एक वेगळे रूप लोकांच्या समोर आले आहे. हा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आला 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी