Police saved life: चालत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पोलिसाने वाचवलं मृत्यूच्या दाढेतून, पाहा VIDEO

रेल्वेनं वेग घेतल्यानंतर संतुलन गेल्यामुळे मुलासह प्लॅटफॉर्मवर कोसळलेली महिला आणि तिचा मुलगा यांचा जीव वाचवण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाने जीवाची बाजी लावत मुलाचे प्राण वाचवले. त्यानंतर रेल्वेखाली परफटत चाललेल्या या महिलेच्या मदतीला आणखी एक प्रवासी धावून आला आणि त्याने महिलेला रेल्वेखालून खेचून बाहेर काढले.

Desi Ghee Benefits
चमकदार त्वचेसाठी देशी तुपाचा वापर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रेल्वे पोलिसाने शौर्य दाखवत वाचवला जीव
  • धावत्या ट्रेनमधून पडलेल्या मुलाचा वाचवला जीव
  • ट्रेनसोबत फरफटत जाणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी प्रवाशाचा पुढाकार

Police saved life: रेल्वे पकडण्याच्या नादात रेल्वेतून खाली पडलेल्या महिलेला (Woman)आणि तिच्या मुलाला (Kid) प्रसंगावधान राखून एका पोलिसाने (Railway police) वाचवलं. रेल्वेनं वेग घेतल्यानंतर संतुलन गेल्यामुळे मुलासह प्लॅटफॉर्मवर कोसळलेली महिला आणि तिचा मुलगा यांचा जीव वाचवण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाने जीवाची बाजी लावत मुलाचे प्राण वाचवले. त्यानंतर रेल्वेखाली परफटत चाललेल्या या महिलेच्या मदतीला आणखी एक प्रवासी धावून आला आणि त्याने महिलेला रेल्वेखालून खेचून बाहेर काढले. नवी मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. ही घटना रेल्वे स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली असून रेल्वे खात्याने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. 

पोलिसाचे शौर्य

मानखुर्द रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ होती. एकामागून एक लोकल गाड्या खचाखच भरून जात होत्या. यावेळी अक्षय सोय नावाचे रेल्वे पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर तैनात होते. प्लॅटफॉर्मवर हजर राहून आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ते बारकाईनं लक्ष ठेवून होते. त्याचवेळी एक ट्रेन आली आणि प्लॅटफॉर्मवर उभी राहिली. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. या गर्दीत एक महिला आपल्या मुलाला घेऊन चढण्याचा प्रयत्न करत होती. गर्दीत ही महिला ट्रेनमध्ये कशीबशी चढली, मात्र आत जाऊ शकली नाही. ट्रेन सुरू होताच, त्या वेगाने ही महिला तोल जाऊन प्लॅटफॉर्मवर कोसळली. तिच्यासोबत असणारा मुलगाही खाली कोसळला. 

अधिक वाचा - Tiger attacked woman: कारमध्ये बसताना वाघाची झडप, महिलेला नेलं खेचत, पाहा व्हिडिओ

पोलिसाने दाखवले प्रसंगावधान

महिला आणि तिचा मुलगा खाली कोसळल्यानंतर काही क्षणांतच रेल्वेने वेग घेतला. महिला आणि तिचा मुलगा रेल्वेच्या अगदी जवळ होते आणि रेल्वेखाली जाण्याची शक्यता होती. त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या अक्षय सोय यांनी मुलाकडे झेप घेत त्याला खेचून बाहेर काढले. मात्र ही महिला अजूनही ट्रेनपासून दूर होण्यासाठी झटापट करत होती. ट्रेनपासून तिला दूर होता येत नव्हते आणि कुठल्याही क्षणी ती ट्रेनखाली जाण्याची शक्यता होती. मात्र तिच्या मदतीला प्लॅटफॉर्मवरील एक प्रवासी धावून आला. त्याने महिलेचा हात घट्ट पकडून तिला रेल्वेपासून दूर खेचले. त्यामुळे महिला रेल्वेखाली पडता पडता वाचली आणि तिचा जीव वाचू शकला. 

अधिक वाचा - किंग कोब्राची टूर टूर, आठवड्यानंतर कोब्राची घरवापसी

पोलिसांचे कौतुक

आरपीएफकडून ही कामगिरी बजावणाऱ्या पोलिसाचे कौतुक करण्यात आले असून या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे. लोकलमध्ये चढताना काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईल धावपळीत ट्रेन पकडण्याच्या नादात अनेकदा तोल जाऊन अपघात होतात. ट्रेन वेगात असताना त्यातून खाली कोसळणारे अनेक प्रवासी ट्रेनखाली जाण्याचीच शक्यता असते. त्यासाठी प्रवाशांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून प्रवासी महिला आणि मुलाचा जीव वाचवल्याबद्दल पोलिस आणि जबाबदार नागरिकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी