Viral News: डॉक्टरांनी पोटातून काढल्या चाव्या, नाणी आणि चिलीमही!

व्हायरल झालं जी
Updated Jun 18, 2019 | 17:18 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Viral News: उदयपूरमधील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी एक आव्हानात्मक ऑपरेशन केले आहे. त्यात रुग्णाच्या पोटातून ८० लोखंडी यशस्वीरित्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. संबंधित रुग्णाची प्रकृती आता बरी आहे.

80 objects removed from stomach in rajasthan
डॉक्टरांनी पोटातून काढल्या चाव्या, नाणी आणि चिलीम  |  फोटो सौजन्य: ANI

उदयपूर : भारतासारख्या महाकाय देशात कानाकोपऱ्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. काही वेळा देशातील घटना आश्चर्यानं तोंडात बोट घालायला भाग पाडतात तर, काही वेळा अशा घटना डोक्याला हात लावायला भाग पाडतात. अशीच एक घटना हिमाचल प्रदेशमध्ये नुकतीच घडली आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी ही घटना एक आव्हान आहे. डॉक्टरांनी ऑपरेशनच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या पोटातून चमचे, टूथब्रश, किचनमधील सुरी बाहेर काढण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती ३५ वर्षांची असून, मनोरुग्ण असल्यामुळं त्यानं या वस्तू गिळल्या होत्या, असे सांगण्यात आले आहे. पण, त्या वस्तू अन्ननिलेकतून त्याच्या पोटापर्यंत पोहोचल्याच कशा यावरून आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेषतः सुरी त्याने कशी गिळली असावी, याचा केवळ अंदाज बांधला जात आहे. डॉक्टरांनी हे आव्हानात्मक ऑपरेशन योग्यरित्या पार पाडून संबंधित व्यक्तीचा जीव वाचवल्याने समाधान व्यक्त होत आहे. ही घटना एक महिन्यापूर्वीची आहे.

 

 

एक्स रे होता धक्कादायक

दरम्यान, अशाच स्वरूपाची आणखी एक घटना घडली असून, राजस्थानमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. उदयपूरमधील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी एक असेच आव्हानात्मक ऑपरेशन केले आहे. त्यात रुग्णाच्या पोटातून ८० अशाच लोखंडी आणि मजबूत वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यात चाव्या, नाणी आणि चिलीमचाही समावेश होता. हा व्यक्तीही मनोरुग्ण असल्याचीच माहिती डॉक्टरांनी दिली आहे. काल सोमवारी हे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले. या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. याबाबत डॉ. डी. के. शर्मा यांनी एएनआयला विशेष मुलाखत दिली. शर्मा म्हणाले, ‘अर्थातच ही एक विचित्र आणि आव्हानात्मक केस होती. पोटात प्रचंड वेदना होत असल्याच्या कारणाने या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा एक्सरे काढण्यात आला. त्यात छोट्या मोठ्या वस्तू दिसल्याने आम्ही अक्षरश: स्तब्ध झालो होतो.’

एकूण ८०० ग्रॅम वस्तू बाहेर काढल्या

न्यूज एजन्सी एएनआयने संबंधित रुग्णाच्या पोटातून बाहेर काढलेल्या वस्तू आपल्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. एक्सरे पाहून सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न करतात संबंधिताचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात एक-एक करत ८० वस्तू बाहेर काढण्यात आल्या. त्यांचे वजन ८०० ग्रॅमच्या आसपास आहे. डॉ. शर्मा यांनी सांगितले की, संबंधित व्यक्ती मनोरुग्ण आहे. त्यानं या सगळ्या वस्तू गिळल्या होत्या. पण, त्यानं सतत पोट दुखीची तक्रार केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला सराकारी रुग्णालयात दाखल केले होते. संबंधित रुग्णाची प्रकृती आता बरी असून, त्याच्या प्रकृतीचा धोका आता टळला असल्याचेही शर्मा यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Viral News: डॉक्टरांनी पोटातून काढल्या चाव्या, नाणी आणि चिलीमही! Description: Viral News: उदयपूरमधील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी एक आव्हानात्मक ऑपरेशन केले आहे. त्यात रुग्णाच्या पोटातून ८० लोखंडी यशस्वीरित्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. संबंधित रुग्णाची प्रकृती आता बरी आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola