लग्नाच्या ७ वर्षांनंतर एक-दोन नाही तर तब्बल ५ बाळांना दिला जन्म पण....

Woman delivers 5 babies: एका गरोदर महिलेने एक-दोन नाही तर तब्बल पाच बाळांना एकाचवेळी जन्म दिला आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • लग्नाच्या सात वर्षांनंतर महिलेने दिला बाळांना जन्म
  • एकाच वेळी पाच बाळांना दिला जन्म
  • ज्यामध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा होता समावेश 

Woman gave birth 5 children together: आतापर्यंत तुम्ही जुळी मुलं झाल्याचं, किंवा तीन मुलांना जन्म दिल्याचं ऐकलं असेल पण राजस्थानमधील एका महिलेने एकाचवेळी पाच मुलांना एकत्र जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. करौली जिल्ह्यातील मासलपूर येथील पिरानी गावात राहणाऱ्या रेश्माने करौली येथील जिल्हा रुग्णालयात महिलाने पाच बाळांना जन्म दिला. सोमवारी एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे वृत्त संपूर्ण रुग्णालयात वाऱ्यासारखं पसरलं आणि त्यानंतर सर्वचजण बाळांना पाहण्यासाठी दाखल झाले. (Rajasthan woman delivered 5 babies together after 7 years of marriage at karauli)

रुग्णालयाच्या डॉक्टर आशा मीणा यांनी सांगितले की, रेश्माने दोन मुलांना आणि तीन मुलींना अशा एकूण पाच बाळांना जन्म दिला. रेश्मा सात महिन्यांची गरोदर होती आणि सातव्या महिन्यातच तिची प्रसुती झाली. प्रसुतीनंतर रेश्माची प्रकृती एकदम ठिक आहे. मात्र, या बाळांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. प्री मॅच्युअर असलेल्या मुलांना जयपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी चार बाळांचा रस्त्यातच मृत्यू झाला तर एका बाळाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या सर्व मुलांचे वजन १०० ते ६६० ग्रॅम दरम्यान होते.

अधिक वाचा : Brainy Farmer : शास्त्रज्ञापेक्षाही हुशार शेतकरी, पक्ष्यांना हाकलण्यासाठी केला जबराट जुगाड, पाहा VIDEO

सातव्या महिन्यातच प्रसुती झाल्याने...

करौली जिल्हा रुग्णालयाचे एनआयसीयूचे प्रभारी डॉ. महेंद्र मीणा यांनी सांगितले की, सर्व मुलांचे वजन कमी होते. या मुलांसाठी आवश्यक ती वैद्यकीय सुविधा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना जयपूर येथील जेके लॉन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. यापैकी दोन मुले आणि दोन मुलींचा वाटेतच मृत्यू झाला. तर एका बाळाचा जेके लॉन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

अधिक वाचा : Deathpool:  या स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेल्यावर जातो जीव, नव्या जलाशयाच्या शोधामुळे उलगडतील अनेक रहस्यं

लग्नानंतर सात वर्षांनी बाळाला जन्म

या महिलेचा पती अश्क अली हा केरळमध्ये मार्बल फिटिंगचं काम करतो. त्याचा विवाह सात वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, लग्न झाल्यापासून त्यांना आपत्य नव्हतं. त्यामुळे या दाम्पत्याने अपत्य होण्यासाठी विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा घेतले होते. अखेर सात वर्षांनी रेश्मा गरोदर झाली आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण, रेश्माने जन्म दिलेल्या पाचही बाळांचा मृत्यू झाला आहे.

स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. कैलास शर्मा यांनी म्हटलं की, दीर्घकाळापासून मुले नसल्याने अशा परिस्थितीत उपचार घेणाऱ्या महिलेला जुळी मुलं होण्याच्या घटना समोर येत असतात. मात्र, अशा प्रकारे एकाचवेळी पाच बाळांना जन्म देण्याची घटना घडली आहे. पण दुर्दैवाने मुलांना वाचवता आलं नाही. अशा प्रकारची प्रसुती त्याच ठिकाणी करावी जेथे सर्व वैद्यकीय सुविधा असतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी