कपिल देवांवर चढला अभिनेता रणवीर सिंहचा रंग; गोलंदाजी करताना घातला घागरा तर कधी रंगतदार गॉगल्स

रताचे पहिले क्रिकेट विश्वचषक विजेता कप्तान कपिल देव  यांचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून अनेक जण त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

Ranveer Singh's color on Kapil Dev
कपिल देवांवर चढला रणवीर सिंहचा रंग  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • क्रेडचे जाहिरातदार नेहमी अशाची महान व्यक्तींना त्यांच्या असलेल्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या रंगात दाखवत असतात.
  • राहुल द्रविड यांना "इंदिरानगरचा गुंडा" आणि जैकी श्रॉफला एक ज़ुम्बा ट्रेनर के रूपात दाखवले होते.
  • कपिल देव यांना रणवीर सिंहच्या रुपात दाखवण्यात आले आहे.

नवी दिल्ली :  भारताचे पहिले क्रिकेट विश्वचषक विजेता कप्तान कपिल देव  यांचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून अनेक जण त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ एका जाहिरातीचा आहे, यात कपिल देव यांना अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) ची नक्कल करताना दाखविण्यात आले आहे. परंतु रणवीर सिंहच्या गेटअपमध्ये कपिल देव आणि त्याच्या प्रमाणे चाळे करणं ही कल्पना किती मजेदार आणि हसू आणणारी आहे ना? क्रेडचे जाहिरातदार नेहमी अशाची महान व्यक्तींना त्यांच्या असलेल्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या रंगात दाखवत असतात. याआधाही त्यांनी राहुल द्रविड यांना "इंदिरानगरचा गुंडा" आणि जैकी श्रॉफला एक ज़ुम्बा ट्रेनर के रूपात दाखवले होते. 

दरम्यान कपिल देव यांचा व्हिडिओ वेगवेगळ्या सेटिंग्समध्ये दाखवण्यात आला आहे. पहिल्या सेटमध्ये दिग्गज क्रिकेटरांमध्ये पिंक आउटफिट परिधान केलेले कपिल देव टाळ्या टिपताना दिसतात. नंतर एका सामन्यामध्ये गल्लीमध्ये उभे राहत चेंडू आपल्या पिंक ड्रेसमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतात.   जाहिरातीच्या इतर भागातही ते अनेक आऊटफिट घातलेले दिसत आहेत. एका क्लिपमध्ये ते चांदी सारख्या चमकणाऱ्या कपड्यांमध्ये ते दिसतात,

तर दुसऱ्या अजून एका क्लिपमध्ये ते सोनेरी रंगाचे कपडे, हेल्मेट, सर्व सोनेरी रंगाचे दिसत आहेत. त्याचे हे रुप आपल्याला रणवीर सिंहची आठवण करून देतात.

कारण रणवीर सिंह हे अशाच अगळ्या वेगळ्या कपड्यांमध्ये दिसत असतो. व्हि़डिओ प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत १.७ मिलियनवेळा पाहण्यात आला आहे. काही सोशल मीडियावरील सक्रीय युझर्संनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एका म्हटले आहे की, “कपिल देव यांची बायोपिक रिलीज होण्याआधी रणवीर सिंहची बायोपिक कपिल देव यांनी रिलीज केली आहे.”  रणवीर सिंहची ८३ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यांच्या जीवनावर आधारित असून रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.  


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी