Asian Palm Civet : सांगलीत दिसले दुर्मीळ उदमांजर, व्हिडीओ व्हायरल

सांगली जिल्ह्यात दुर्मीळ प्राणी उदमांजर दिसले. हे उदमांजर पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. नंतर वनविभागाने हे उदमांजर पकडून सुरक्षित जंगलात सोडून दिले.

थोडं पण कामाचं
  • सांगली जिल्ह्यात दुर्मीळ प्राणी उदमांजर दिसले.
  • हे उदमांजर पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
  • नंतर वनविभागाने हे उदमांजर पकडून सुरक्षित जंगलात सोडून दिले.

Asian Palm Civet : सांगली :  सांगली जिल्ह्यात दुर्मीळ प्राणी उदमांजर दिसले. हे उदमांजर पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. नंतर वनविभागाने हे उदमांजर पकडून सुरक्षित जंगलात सोडून दिले. (rare animal  Asian Palm Civet seen in sangali video gone viral)

अधिक वाचवा : रात्री झोपेत पतीच्या स्वप्नात आली दुसरीच महिला अन् मग संतप्त झालेल्या पत्नी जबरदस्त बदला

सांगली जिल्ह्यातील  शिराळा तालुक्यातील औंढी येथील संजय कांबळे यांच्या दारात आज सकाळी दुर्मिळ असे उदमांजर दिसून आले. हे पाहण्यासाठी गल्लीतील नगरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी संजय कांबळे यांनी या उदमांजराला पकडून वनविभागाचे अधिकारी हणमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर वनविभागाने जंगलात सोडून दिले.

अधिक वाचवा : Rare Blue Lobster : अमेरिकन मासेमाराला सापडला अत्यंत दुर्मिळ निळा लॉबस्टर, पाहा कसा असतो

हे उदमांजर भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे आणि भारताबाहेर ब्रम्हदेश, इंडोचायना आणि मलायात आढळतो.याचे केस मऊ व तुळतुळीत असतात. रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असतो.

उदमांजर मूळ सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी वायव्य भारतातील वाळवंट, मध्य भारतातील शुष्क प्रदेश आणि महाराष्ट्र या भागांतही तो राहू शकतो कारण या प्रदेशांच्या हवापाण्याशी त्याचे अनुकूल झालेले असते.

अधिक वाचवा : गर्लफ्रेंडच्या धूर्तपणाला कंटाळून प्रियकराने केले ब्रेकअप, पत्रात लिहंल... मोठा भाऊ म्हणून माफ कर!

उदमांजराच्या विष्ठेपासून कॉफी

इंडोनेशियासह अनेक देशात उदमांजराच्या विष्ठेपासून कॉफी बनवतात. उदमांजराला भरपूर कॉफीच्या चेरी खाऊ घातल्या जातात. नंतर विष्ठेवाटे या कॉफीच्या बिया निघतात. या बिया नंतर धुवून वाळवल्या जातात आणि भाजल्या जातात. या बिया भाजल्यानंतर त्यापासून कॉफी बनवतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी