बंगळुरू : बंगळुरू मध्ये नुकतेच चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सव एक कृष्णा नावाचा बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. कृष्णाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. हा बैल आता साडेतीन वर्षांचा आहे, हा बैल हल्लीकर जातीचा बैल आहे. वृत्तसंस्था एएनआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. (Rare Breed of Bull: 1 crore bid for bull at Bangalore Agriculture Festival, its sperm dose is sold for Rs.)
बंगळुरू येथे आयोजित 4 दिवसीय कृषी महोत्सव अतिशय अत्याधुनिक पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. लोक त्यात फिजिकल आणि वर्चुअली दोन्ही प्रकारे सहभागी होऊ शकत होते. एकप्रकारे हा पहिलाच कृषी महोत्सव होता.
एएनआयला माहिती देताना बैल मालकाने सांगितले की, हल्लीकर जातीच्या बैलांच्या स्पर्मला खूप मागणी आहे. त्याच्या वीर्याचा एक डोस तो १ हजार रुपयांना विकतो असे त्याने सांगितले. बोरेगौडा म्हणाले की, हाळीकर जातीची सर्व गुरे A2 प्रोटॉन असलेल्या दुधासाठी ओळखली जातात. बैल मालकाने सांगितले की, आता ही प्रजाती हळूहळू नामशेष होत आहे. कृष्णा बैल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी लाख नव्हे, तर कोट्यवधी रुपयांपर्यंत बोली लावली. बैल मालकाने सांगितले की, महोत्सवात एका खरेदीदाराने कृष्णा बैल 1 कोटी रुपयांना विकत घेतला.
यावर यूजर्सच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. यावर आतापर्यंत हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कृष्णा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.