Viral News: ऐकलं का! दुर्मिळ अवस्थेत कायमस्वरूपीचं हास्य घेऊन जन्माला आलयं बाळ; पाहा फोटो

व्हायरल झालं जी
Updated Jun 03, 2022 | 14:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral News In Marathi | आजच्या विकसित जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. जगातील कानाकोपऱ्यात घडलेल्या विचित्र आणि अनोख्या घटना देखील लगेचच जगजाहीर होत असतात. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातील एक लहान बाळ जन्मताच कायमस्वरूपीचे हास्य घेऊन आले आहे.

rare condition a baby is born with a permanent smile, See photo
दुर्मिळ अवस्थेत कायमस्वरूपीचं हास्य घेऊन जन्माला आलयं बाळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दुर्मिळ अवस्थेत कायमस्वरूपीचं हास्य घेऊन जन्माला आलयं बाळ.
  • ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या बाळाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
  • आयला समर मुचाचा या बाळाचा जन्म डिसेंबर २०२१ मध्ये द्विपक्षीय मॅक्रोस्टोमियासह झाला होता.

Viral News In Marathi | नवी दिल्ली : आजच्या विकसित जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. जगातील कानाकोपऱ्यात घडलेल्या विचित्र आणि अनोख्या घटना देखील लगेचच जगजाहीर होत असतात. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातील एक लहान बाळ जन्मताच कायमस्वरूपीचे हास्य घेऊन आले आहे. दरम्यान या बाळाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. बाळाच्या पालकांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून बाळाला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. सध्या या बाळाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (rare condition a baby is born with a permanent smile, See photo). 

बाळाच्या पालकांना समजल्यावर बसला होता धक्का

दरम्यान, आयला समर मुचाचा या बाळाचा जन्म डिसेंबर २०२१ मध्ये द्विपक्षीय मॅक्रोस्टोमियासह झाला होता, ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे जिथे बाळ गर्भाशयात असताना तोंडाचे कोपरे व्यवस्थित जुळत नाहीत. या स्थितीला द्विपक्षीय मॅक्रोस्टोमिया असे देखील म्हणतात. आयलाचे पालक क्रिस्टीना वर्चर आणि दक्षिण ऑस्ट्रेलियातील ब्लेझ मुचा यांना त्यांच्या बाळाचे तोंड सामान्य नसल्याचे समजले तेव्हा मोठा धक्का बसला होता. 

दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे वर्चर यांनी जॅम प्रेसला सांगितले की, "ब्लेज आणि मला या अवस्थेची यापूर्वी माहिती नव्हती तसेच मी मॅक्रोस्टोमिया असलेल्या एखाद्या व्यक्तीला कधीच भेटलो नाही, म्हणूनच ही स्थिती आमच्यासाठी धक्कादायक होती. जेव्हा  क्रिस्टीना वर्चरने पहिल्यांदा तिच्या बाळाला पाहिले तेव्हा आयला खूप लहान होती. तेव्हा तिला बाळाची खूप काळजी लागली होती. असे तिने म्हटले. 

डॉक्टरांनाही बसला धक्का

दक्षिण ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथील फ्लिंडर्स मेडिकल सेंटरमधील डॉक्टर सुरुवातीला या बाळाला पाहून चक्रावून गेले. कारण त्यांनी यापूर्वी एकही अशी केस पाहिली नव्हती. बाळाच्या पालकांना या स्थितीबद्दल माहिती देण्यासाठी त्यांना अनेक तास लागले. "यामुळे अधिक अडचणी आल्या कारण हॉस्पिटलला अशा दुर्मिळ स्थितीबद्दल थोडेसे ज्ञान किंवा त्याबद्दल अधिक माहिती नव्हती म्हणून त्यांना वेळ लागला अशी माहिती बाळाच्या आईने दिली. 

बाळाच्या आईने व्यक्त केली भावना

दरम्यान या लहानग्याच्या आईने म्हटले की, एक आई म्हणून मी फक्त विचार करू शकत होते की मी कुठे चुकले, विशेषत: जेव्हा मी माझ्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान खूप काळजीत होते. तरीही अनेक दिवसांच्या अनुवांशिक चाचणी आणि स्कॅननंतर तिच्या वडिलांना आणि मला अनेक डॉक्टरांनी आश्वस्त केले होते. ही स्थिती पूर्णपणे आमच्या नियंत्रणाबाहेर होती आणि आमची स्वतःची चूक नव्हती. अशी भावनिक प्रतिक्रिया बाळाच्या आईने दिली. 

सोशल मीडियावर जोरदार चर्चा 

आयलाच्या जन्मानंतर काही महिन्यांनंतर तिच्या पालकांनी या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी TikTok अकाउंट @cristinakylievercher सुरू करण्याचा निर्णय घेतला. या आशेने की त्यांना आणखी काही उत्तरे मिळतील. दरम्यान आयलावर सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरील युजर्स आयलाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. काही युजर्स आयलाच्या या धाडसाचे देखील कौतुक करत आहेत. काही युजर्संनी म्हटले की, आमच्या माहितीनुसार आतपार्यंत अशा फक्त १४ केसेस आहेत त्यामुळे तुमच्या बाळाचा अभिमान बाळगा असे म्हटले. काही नकारात्मक टिप्पण्या असल्या तरी, कुटुंबाला नकारात्मकतेपेक्षा जास्त प्रेमाचा वर्षाव झाला आहे. तसेच "आम्ही आमचे अनुभव आणि आवडत्या आठवणी शेअर करणे थांबवणार नाही कारण आम्हाला खूप अभिमान आहे. असे बाळाची आई वर्चरने म्हटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी