Beauty of Nature : निसर्ग (Nature) दररोज वेगवेगळ्या रुपात आपलं सौंदर्य (Beauty) दाखवत असतो. प्रत्येक काळात, प्रत्येक ऋतुत वेगवेगळी रुपं धारण करणारा निसर्ग कधी कधी असं रुप दाखवतो, जे शतकातून एकदाच दिसतं. असा नजारा दिसला की लोक आनंदाने फुलून जातात आणि ते दृष्य नजरेत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही वर्षांपूर्वी निसर्गाचे असे चमत्कार ज्या भागात घडायचे, त्याच भागातील नागरिकांना ते पाहता येत असत. मात्र कॅमेऱ्याचा शोध लागल्यापासून आणि गेल्या काही वर्षात मोबाईल क्रांती झाल्यापासून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घडणारा निसर्गाचा चमत्कार कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून ठेवता येऊ शकतो. असाच एक चमत्कार चीनमध्ये घडला आहे. इंद्रधनुष्य तर आपण अनेकदा पाहिलेलं असतं. मात्र आकाशात दाटी केलेल्या ढगांनीच (Clouds) इंद्रधनुष्याचा (Railbow) रंग धारण केल्याचं सहसा दिसत नाही. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ निसर्गाचा नेमका हाच चमत्कार दाखवतो.
Rainbow colored scarf cloud over Haikou city in China pic.twitter.com/ewKmQjsiIE — Sunlit Rain (@Earthlings10m) August 26, 2022
चीनमधील हैनान प्रांतात निसर्गानं आपला हा चमत्कार दाखवला आहे. या भागातील हायकोऊ शहरात हा नजारा पाहता आला. 21 ऑगस्ट या दिवशी हायकोऊचं आकाश काहीसं असं रंगीबेरंगी दिसत होतं. इंद्रधनुष्यानं असं काही रुपडं घेतलं होतं की आभाळात आलेले सगळे ढग जणू रंगपंचमी खेळून आल्यासारखे दिसत होते.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागातील नगारिक या व्हिडिओचा आनंद लुटताना दिसत आहेत. आतापर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून तो जोरदार फॉरवर्ड केला जात आहे. चार हजारापेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ रिट्विटही केला आहे. केवळ नऊ सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
अधिक वाचा - Chand Nawab Video : चांद नवाबचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, पाण्यात शिरून धमाकेदार रिपोर्टिंग
जणू ढगांनी सप्तरंगी कपडे घातले आहेत आणि वरून रंगीबेरंगी मुकूट धारण केला आहे, असं हा व्हिडिओ पाहून वाटतं. कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेल्या दृष्यांमध्येच जर हा निसर्गाचा चमत्कार इतका विलोभनीय दिसत असेल, तर प्रत्यक्षात तो किती अद्भूत असेल, याचा विचार अनेकजण करत आहेत. असा चमत्कार कित्येक वर्षातून पाहता येतो. निसर्ग हा चमत्कार कधी दाखवेल, याचा कुणालाही अंदाज येऊ शकत नाही. त्यामुळे ज्या भागातील नागरिकांना हा चमत्कार पाहता आला,ते फारच सुदैवी असून त्यांचा आपल्याला हेवा वाटत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी या व्हिडिओवर दिल्या आहेत. या प्रकाराला ‘स्कार्फ क्लाऊड’ असं म्हटलं जातं.