Sex Crime : ओटावा : शारिरीक संबंध (Physical Relationship) ठेवताना जोडीदाराच्या परवानगीशिवाय (consent) कंडोम (Condom) काढणे हा गंभीर गुन्हा (Sex Crime) आहे असे मत कोर्टाने (Court) व्यक्त केले आहे. कॅनडातील (Canada) ही घटना असून या कपलची ओळख ऑनलाईन झाली होती. त्यानंतर दोघांनी शारिरीक संबंध ठेवले. परंतु तरुणाने आपल्या जोडीदाराच्या संमतीशिवाय कंडोम काढला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले.
अधिक वाचा : श्रावणात 'या' गावातील महिला पाच दिवस परिधान करत नाहीत कपडे, काय आहे अजब प्रथा अन् कारण?
मिळालेल्या माहितीनुसार रॉस मॅकेंजी किर्कपॅट्रिक याची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणीशी झाली. दोघांची चांगली मैत्री झाली आणि दोघांमध्ये शारिरीक संबंधही निर्माण झाले. पहिल्यांदा दोघांनी शारिरीक संबंध ठेवताना रॉसने कंडोम वापरल होता. दुसर्यांदा शारिरीक संबंधावेळी रॉसने कंडोम काढला. जेव्हा तरुणीला ही गोष्ट कळाली तेव्हा ती खाबरून गेली. तित्ने तत्काळ एचआयव्हीची टेस्ट करून त्याचे उपचार घेण्यास सुरूवात केली.
परंतु रॉसने हे आरोप फेटाळून लावले आहे. शारिरीक संबंधावेळी आपण आपल्या जोडीदाराला कंडोम काढण्याबद्दल विचारले होते आणि यासाठी तिची संमती होती असे रॉसने म्हट्ले आहे. तर पीडित तरुणीने कंडोम वापरणार असल्यानेच शारिरीक संबंधांसाठी संमती दर्शवल्याचे म्हटले आहे. तरुणीने आता रॉसवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने रॉसच्या बाजूने निकाल दिला होता. तसेच कंडोम न वापरण्यावरही तरुणीने शारिरीक संबंधांसाठी संमती दर्शवली ही बाब न्यायालयाने अधोरिखित केली.
अधिक वाचा : Condom मध्ये नशाच नशा!, पश्चिम बंगालच्या पोरांना लागलं नवं व्यसन, घेतायत कंडोमची वाफ
कनिष्ठ न्यायालयाने तरुणाला दिलासा मिळाल्यानंतर पीडित तरुणीने वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली. तेव्हा कोर्टाने रॉसला दोषी ठरवले, तसेच शारिरीक संबंधावेळी आपल्या जोडीदाराच्या परवानगीशिवाय कंडोम काढणे हा गुन्हा आहे. या निर्णयामुळे शारिरीक संबंधांचे नियम बदलतील असे मत रॉसच्या वकिलांनी व्यक्त केले. आता रॉसवर लैंगिक शोषणाचा खटला सुरू होणार आहे.
काही अभ्यासांनुसार गेल्या दहा वर्षांत कंडोम वापरण्याचा विरोध वाढत आहे. पुरुष मोठ्या संख्येने आपल्या जोडीदारासोबत शारिरीक संबंध ठेवताना कंडोम वापरत नसल्याचे अनेक महिलांनी सांगितले आहे. इंग्लंड आणि स्विर्त्झलँड शारिरीक संबंधावेळी कंडोम काढल्याप्रकरणी अनेक पुरुषांना दोषी ठरवण्यात आले आहे.