या रेस्टॉरंटमध्ये मिळते 'विनामूल्य' भोजन

व्हायरल झालं जी
Updated May 21, 2019 | 23:27 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Sakin Halal Grill: एक असे हॉटेल जेथे लोकांना विनामूल्य जेवन खाऊ घातलं जातं. पाहा कुठं आहे हे रेस्टॉरंट? कोण आहेत मालक? आणि विनामूल्य जेवण खाऊ घालण्यामागे काय आहे त्यांचा उद्देश.

Restaurant serve free food
विनामुल्य जेवन देणारे हॉटेल  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबईः जगभरात आजही अनेक लोक अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांपासुन वचिंत आहेत. आजही अनेक लोकांना एकवेळेचे जेवण मिळत नाही. अनेकांना उपासमारीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशाच लोकांना मदत करण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. ज्या अशा लोकांना प्राथमिक मुलभूत गरजा पुरवण्याचे काम करत आहेत. आज आम्ही आपल्याला अशाच एका रेस्टॉरंटबद्दल सांगणार आहोत जे लोकांना मोफत जेवण खाऊ घालत आहे. 

अमेरिकाच्या वॉशिंगटन डीसीमधील व्हाईट हाऊस येथून हाकेच्या अंतरावर एक रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटचं नाव आहे “सकीना हलाल ग्रिल”. या रेस्टॉरंटमध्ये मागील अनेक वर्षापासुन विनामूल्य भोजण खाऊ घातले जातं आहे. हे साधारण रेस्टॉरंट नसून हे एक हायप्रोफाईल रेस्टॉरंट आहे. मात्र इतर हायप्रोफाईल रेस्टॉरंटपेक्षा हे खूपचं वेगळं आहे.  या रेस्टॉरंटमध्ये गरजवंत लोकांना मोफत जेवण खाऊ घातलं जातं. रेस्टॉरंटचे मालक जी मन्नान यांनी मागील पाच वर्षात जवळपास ८०,००० लोकांना विनामूल्य जेवन खाऊ घातलं आहे. जर कोणी मन्नान यांना भुक लागली असल्याचे सांगितलं तर मन्नान त्या व्यक्तिला जेवन खाऊ घालतात.

मन्नान यांनी सांगितले, २०१३मध्ये त्यांनी या रेस्टॉरंटची सुरुवात केली होती आणि तेव्हापासुनच विनामूल्य जेवण देण्याची अमंलबजावणी ते करत आहेत. स्थानिक मीडिया सोबत बोलताना त्यांनी सांगितलं की, ते लोकांना स्वतःहून सांगतात की जर आपल्याकडे जेवण विकत घेण्यासाठी पैसे नाहीयेत तर आपल्याला त्रस्त होण्याची गरज नाहीये. आपण येथे माझ्यासोबत बसून आनंदाने भोजण करू शकतात.

पुढे त्यांनी सांगितले, आपल्या लहानपणी त्यांनी अत्यंत गरिबी, उपासमार पाहिली आहे. तेव्हापासुनच त्यांनी पुढे चालून गरजू लोकांना विनामूल्य जेवन देण्याचं ठरवलं. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या एका छोट्या गावात त्यांचे संगोपण झाले, त्याकाळी त्यांनी अत्यंत गरिबी, उपासमार यांचा सामना केला होता. 

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मन्नान यांनी सांगितलं, “बेघर लोकांना अन्नासाठी त्रस्त पाहतांना मला खूप दुःख होते. उपाशी लोकांना पाहून मला माझे मागील आयुष्य आठवते." प्रत्येक वर्षी १६,००० गरजवंतांना विनामूल्य जेवन खाऊ घालण्याचे मन्नान यांचं धेय्य असल्याचंही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
या रेस्टॉरंटमध्ये मिळते 'विनामूल्य' भोजन Description: Sakin Halal Grill: एक असे हॉटेल जेथे लोकांना विनामूल्य जेवन खाऊ घातलं जातं. पाहा कुठं आहे हे रेस्टॉरंट? कोण आहेत मालक? आणि विनामूल्य जेवण खाऊ घालण्यामागे काय आहे त्यांचा उद्देश.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola