६ वर्षांच्या मुलानं सोडवलं अनेक वर्षांपूर्वीचं दरोड्याचं रहस्य, मिळालं मौल्यवान सामान

व्हायरल झालं जी
Updated May 22, 2020 | 22:10 IST | टाइम्स नाऊ हिंदी

जवळपास ८ वर्षांपूर्वी एका महिलेच्या घरातील मौल्यवान वस्तूंनी भरलेला बॉक्स चोरीला गेला होता. हा बॉक्स अनोख्या पद्धतीनं मासे पकडतांना एका ६ वर्षांच्या मुलानं शोधून काढलाय.

knox brewer
६ वर्षांच्या मुलानं शोधून काढला वर्षांपूर्वी चोरी गेलेला दागिन्यांचा बॉक्स  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • ६ वर्षांच्या मुलानं शोधून काढला वर्षांपूर्वी चोरी गेलेला दागिन्यांचा बॉक्स
  • तलावाजवळ राहणाऱ्या महिलेच्या घरात आठ वर्षांपूर्वी झाली होती चोरी
  • मॅग्नेट फिशिंग करतांना मुलाला सापडला दागिन्यांचा बॉक्स

नवी दिल्ली: अनेक वर्षांपूर्वी घडलेलं एक दरोड्याचं प्रकरण अशावेळी सुटलं, जेव्हा अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना तलावाखाली एक कुलूप लागलेला बॉक्स एका ६ वर्षाच्या मुलाला सापडला. जॉन्स द्वीपच्या नॉक्स ब्रेवर यानं ‘मॅग्नेट फिशिंग’ करत एक जुना बॉक्स शोधून काढला. मुलाच्या आई-वडिलांनी एका टीव्ही चॅनेलसोबत बोलतांना या बाबतीत माहिती दिलीय.

WCIV-TV नं सांगितलं की, या महिन्यात व्हिटनी लेकवर आपल्या कुटुंबियांसोबत बाहेर गेलो होतो, तेव्हा त्याच्या तारेला जोडलेल्या एका चुंबकाला खाली मातीतून एक भारदस्त गोष्ट चिपकली. बायोडरच्या मदतीनं नॉक्सनं ती वस्तू वर ओढली आणि एका व्हिडिओनुसार चुंबकाला लागून कचऱ्याखाली झाकलेले दागिने, क्रेडिट कार्ड आणि एक चेकबुक सापडलं.

मुलाचे वडील जोनाथन ब्रेवरनं सांगितलं, ‘मला माहिती होतं की, योग्य काम करायला पाहिजे. म्हणून आम्ही स्थानिक पोलिसांना बोलावंल, पोलिसांच्या मदतीनं हे रहस्य सोडविण्याचा प्रयत्न केला.’ अधिकाऱ्यांना दिसून आलं की, सामान एका महिलेचं आहे, जी तलावाजवळच रस्त्याच्या पलीकडे राहत होती. महिलेनं सांगितलं की, हे दागिने आणि सामान तिच्या घरातून आठ वर्षांपूर्वी चोरीला गेलं होतं.

बॉक्समधील अनेक वस्तू गायब होत्या, तरीही ब्रूवर्सनुसार, हा शोध खूप मौल्यवान होता. रिपोर्ट्स नुसार महिलेला तिच्या जुन्या बांगड्या पुन्हा इतक्या वर्षांनी परत मिळाल्या. जोनाखन ब्रेवरनं सांगितलं की, ‘पहिली गोष्ट जी त्या महिलेनं केली, ती म्हणजे ती आपल्या गुडघ्यावर बसली आणि नॉक्सला मिठीत घेतलं आणि त्याचे आभार मानले आणि तो जवळ आला म्हणूनही त्याला थॅँक्यू म्हटलं.’

अशाप्रकारची घटना म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. सोबतच नॉक्सच्या कामाचं कौतुकही केलं जातंय. त्या महिलेला आपले जुने दागिने मिळाल्यानंतर जो आनंद झाला तो शब्दात सांगण्यासारखा नाहीय.

मुंबईतही अशीच घटना घडली होती

तब्बल ३३ वर्षांनी चोरीला गेलेली सोन्याची चेन सापडली, असं कुणी सांगितलं तर कुणालाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. मुंबईतील एका व्यक्तीला ३३ वर्षांनंतर त्याच्या आईची चोरी गेलेली चेन सापडली. १९८६ साली मंदिरात जात असतांना चोरांनी सोन्याची चोन चोरली होती. दिलीप शहा यांच्या आईची चेन चोरांनी लंपास केली होती. काही दिवसांपूर्वी दिलीप शहा यांना रेल्वे पोलीस आयुक्त कार्यालयातून पत्र आले आणि चेनची माहिती देण्यात आली. शहा यांच्यासोबतच १०४ जणांना त्यांचे चोरी गेलेले दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळाल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी