Viral Video: फटाका झाला बुमरँग! रॉकेट पेटवलं आणि घडलं भलतंच, व्हिडिओ पाहून फुटेल हसू

हातात रॉकेट धरून ते पेटवण्याचा प्रयत्न दोन तरुणांनी केला. ते यशस्वीरित्या पेटवलंही. मात्र त्यानंतर जेव्हा जमिनीवर ते रॉकेट फेकून दिलं, त्यानंतर घडलेला किस्सा फारच मजेशीर आहे. असं काही आपल्याला अनुभवायला मिळेल, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.

Viral Video
फटाका झाला बुमरँग!  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • तरुणाने हातात घेऊन पेटवले रॉकेट
  • रॉकेट पेटताच झाले बुमरँग
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर दिवाळीशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. दिवाळी (Diwali) आणि फटाके (Cracker) यांचं एकमेकांशी अनोखं नातं आहे. फटाक्यांमुळे हवेचं प्रदूषण होत असलं, तरी अनेकजण दिवाळीत फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. फटाक्यांशिवाय दिवाळीचा आनंद अर्धवट राहिल, असं त्यांना वाटत असतं. फटाके उडवण्याचा उत्साह असणाऱ्या अशाच दोन तरुणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हातात रॉकेट धरून ते पेटवण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला. ते यशस्वीरित्या पेटवलंही. मात्र त्यानंतर जेव्हा जमिनीवर ते रॉकेट फेकून दिलं, त्यानंतर घडलेला किस्सा फारच मजेशीर आहे. असं काही आपल्याला अनुभवायला मिळेल, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. 

दोघांनी पेटवले रॉकेट

दिवाळीत रॉकेट उडवण्याची एक पद्धत असते. त्यासाठी साधारणतः कुठल्याही बाटलीत ठेवून रॉकेट उडवले जाते. ते रॉकेट आकाशात उडावे आणि वरच्या दिशेने जावे, हा त्यामागचा मूळ उद्देश असतो. त्यामुळेच दिवाळीच्या काळात लहान मुलं वेगवेगळ्या ठिकाणी बाटली शोधत फिरत असल्याचं दिसते. तर अशा प्रकारे बाटलीतून रॉकेट न उडवता दोन तरुण हातात पकडून ते पेटवत असल्याचे या व्हिडिओत दिसते. हातात रॉकेट पकडून ते पेटवावे आणि त्यानंतर जमिनीवर फेकून ते आकाशात उडवावे, असा मुलांचा बेत असतो. मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. 

अधिक वाचा - Viral Video: तरुण चालवत होता मधाचं दुकान, मधमाशांनी अचानक केला हल्लाबोल

मुलांची झाली फजिती

दोन तरुण हातात रॉकेट पकडून ते पेटवताना या व्हिडिओत दिसतात. एका मुलाने हातात रॉकेट पकडले आहे. दुसरा मुलगा काडेपेटीतील काडी पेटवून रॉकेटच्या वातीला लावतो. त्यामुळे रॉकेट पेटते. रॉकेटची वात पेटल्यानंतर लगेचच हे तरुण रॉकेट जमिनीवर फेकून देतात आणि तिथून लांब जाऊ लागतात. मात्र रॉकेट पेट घेतल्यावर हवेत जाण्याऐवजी तरुणांच्या दिशेने येते आणि वातीला आग लावणाऱ्या तरुणाच्या पार्श्वभागावर जाऊन चिकटते. 

तरुणाची झाली पंचाईत

आपण पेटवलेले रॉकेट आपल्याच पार्श्वभागावर येऊन चिकटल्याचे पाहून तरुणाची चांगलीच पंचाईत झाली. या रॉकेटमुळे तरुणाच्या कुर्त्यावर दोन छिद्रे पडली. काही क्षण त्या रॉकेटच्या आगीमुळे तरुणाच्या शर्टानेही पेट घेतला होता. मात्र अधिक पेट घेण्याअगोदर त्याच्या मित्राने शर्ट झटकून त्याची संकटातून सुटका केली. त्याने पेटवलेला फटाका बुमरँग होऊन त्याच्यावरच चालून आला. अर्थात, हे रॉकेट छोटे असल्यामुळे कुठलीही गंभीर घटना घडली नाही. 

अधिक वाचा - उन्हात जाताच महिलेच्या कपड्यांचा रंग बदलला, 'जादुई ड्रेस' पाहून लोकं कन्फ्यूज

व्हिडिओ होतोय व्हायरल

हा ठरवून मनोरंजनासाठी करण्यात आलेला प्रयोग असल्याचा दावा काहीजणांनी केला आहे. तर हा प्रयोग केवळ मनोरंजनासाठी असून कुणीही असे प्रयोग करू नयेत, असा सल्लाही देण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून युजर्स त्याचा आनंद घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी