married women love story : उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडलेला तरुण भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला, मात्र महिलेचा नवरा अचानक समोर आलाला. आपले सिक्रेट उघड होईल या भीतीने महिलेने प्रियकराला चोर म्हटले. हे समजताच महिलेच्या पतीने तरुणाला मारहाण केली आणि पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली. (romance going inside house wife turned when husband came home)
अधिक वाचा : पहिल्या सामन्यापूर्वी एमएस धोनी जखमी, खेळ्याबाबत सस्पेंस
हे प्रकरण हरिद्वारच्या ज्वालापूर कोतवाली भागातील आहे. जिथे 25 वर्षीय विवाहित महिलेची सोशल मीडियावर एका तरुणाशी मैत्री झाली. त्यानंतर जवळीक वाढली. महिलेचा पती घरी नसताना महिलेने प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलावले. महिलेचा पती अचानक घरात पोहोचल्यावर महिलेने खोटे बोलून प्रियकराला चोर म्हटले आणि तो चोरीच्या उद्देशाने घरात घुसला आणि तिला किडनॅप करून चोरीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. हे ऐकून पती संतप्त झाला आणि त्याने तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
अधिक वाचा : 1 एप्रिलपासून काय स्वस्त होणार, कशाचे भाव वाढणार?
मारहाण करताना संतापलेल्या पतीने तरुणाला ज्वालापूर पोलिस ठाण्यात नेले आणि पोलिसांकडे चोर म्हणत कारवाईची मागणी सुरू केली, मात्र पोलिसांनी चौकशी केली असता तरुणाने सत्य उघड केले. तरुणाने सांगितले की, त्याचे या महिलेशी अफेअर सुरू आहे. एवढेच नाही तर तरुणाने महिला आणि त्याच्यातील चॅटिंगही पोलिसांना दाखवले. सत्य समोर येताच संतापलेल्या पतीच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो निराश होऊन घरी परतला.