अचानक ट्रॅकवर पडला व्यक्ती अन् तितक्यात वेगाने आली एक्सप्रेस, RPF जवानाने वाचवले प्राण, पाहा VIDEO

RPF Jawan saved life of man who fell on railway tracks: प्लॅटफॉर्मवरुन अचानक रेल्वे ट्रॅकवर एक व्यक्ती पडला आणि तितक्यात समोरून भरधाव एक्सप्रेस येत होती. हे पाहून प्लॅटफॉर्मवरील आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवले आणि या प्रवाशाचे प्राण वाचवले.

RPF jawan saved life of man who fall down on railway track incident caught in cctv watch video
अचानक ट्रॅकवर पडला व्यक्ती अन् तितक्यात वेगाने आली एक्सप्रेस, RPF जवानाने वाचवले प्राण, पाहा VIDEO 
थोडं पण कामाचं
  • रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या व्यक्तीचे आरपीएफ जवानाने वाचवले प्राण
  • आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवल्याने वाचला प्रवाशाचा जीव
  • संपूर्ण घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद

RPF Jawan saved life of passenger: रेल्वे स्थानकात ट्रेनमधून उतरताना-चढताना अनेकदा अपघात होतात किंवा वारंवार सांगूनही अनेक प्रवासी हे ट्रॅक ओलांडतात आणि त्यामुळे अपघातही होतात. रेल्वे स्थानकातील अशा अपघाताच्या घटना समोर येतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, रेल्वे ट्रकॅवर एक व्यक्ती पडतो आणि तितक्यात भरधाव एक्सप्रेस येते. हे चित्र पाहून रेल्वे स्थानकातील प्रवासी सुद्धा गोंधळून गेले तितक्यात तेथे असलेल्या आरपीएफच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवले आणि या प्रवाशाचे प्राण वाचवले. (RPF Jawan saved life of passenger who fell down on track, caught in cctv)

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, अनेक लोक ट्रेन पकडण्यासाठी खूप घाई करतात. तर काही प्रवासी हे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅममध्ये पडतात. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना वारंवार सूचना देऊनही त्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत कधी-कधी मोठ्या दुर्घटनाही घडतात.

रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर असाच एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, रेल्वे स्थानकात अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे आहेत. त्याच दरम्यान एक व्यक्ती रेल्वे प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्यावर येतो आणि त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळतो.

हा व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर पडतो आणि तितक्यात समोरून भरधाव ट्रेन येत होती. हे चित्र पाहून रेल्वे प्लॅटफॉर्मवरील उपस्थित प्रवाशी गोंधळून जातात. नेमकं काय करावं हे कुणाला सूचत नव्हतं. तितक्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन जाणाऱ्या आरपीएफ जवानांनी त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धाव घेतली.

हे पण वाचा : टॉयलटमध्ये दिसला साप, काढला फणा

रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धाव घेत आरपीएफ जवानांनी त्या व्यक्तीला तात्काळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर खेचून घेतले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर खेचल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत त्या ट्रॅकवर भरधाव एक्सप्रेस आली.

काही सेकंदांनी उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पण आरपीएफ जवानांच्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले. आरपीएफ जवानांनी केलेल्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी