एका रात्रीत गायब झाला ७५ फूट उंचीचा संपूर्ण पूल, पाहा कुठे घडली ही घटना

व्हायरल झालं जी
Updated Jun 06, 2019 | 21:02 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

रशियामध्ये संपूर्ण पूल गायब झाला असल्याची हैराण करणारी बातमी समोर आली आहे. लोकांच्या मते हा पूल चोरी करण्यात आला आहे.

bridge
पूल  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: घरातून वस्तू अथवा काही गोष्टी चोरी झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र पुलाची चोरी कधी ऐकली आहे का? सध्या पुलाच्या चोरीची चर्चा एका देशात सुरू आहे. रशियामध्ये याची जोरदार चर्चा होत आहे. रशियामध्ये सध्या एका तुटलेल्या पुलाचे फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की ५६ टनांचा या पुलाचा काही भाग तुटलेला होता. ७५ फूट उंचीच्या या पुलाचा बराचसा भाग फोटोतून गायब आहे. याबाबत लोकांचे असे म्हणणे आहे की, या पुलाचा मधला हिस्सा कोणीतरी चोरी केला आहे. 

दरम्यान, स्थानिक सुरक्षारक्षकांनी याचा तपास सुरू केला आहे. अखेर या पुलाचा मधला भाग गेला तरी कुठे? याचा शोध घेतला जात आहे. डेलीमेलच्या एका रिपोर्टनुसार, उम्बा नदीच्या वर बनवण्यात आलेल्या ५६ टनाच्या एका ब्रिजचा मधला भाग काही दिवसांपासन गायब आहे. यामुळे या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

पूल गायब झाल्याची बातमी मे मध्ये सुरूवातीला समोर आली होती. रिपोर्ट आल्यानंतर याचे अनेक फोटोज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होते. काही लोकांनी यासाठी चोरांना जबाबदार ठरवले होते. तर १६ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, पुलाचा मधला भाग कोसळून नदीमध्ये पडला होता. त्यामुळे पुलाची अशी अवस्था झाली आहे. 

मात्र २६ मेला आलेल्या नव्या फोटोंमध्ये हा पूल पूर्णपणे गायब असल्याचे सांगितले जात आहे. असं म्हटलं जातंय की अज्ञात लोकांनी या पुलाची चोरी केली आहे. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, ही काही जादू अथवा चमत्कार नाही आहे तर एखाद्या माणसांच्या समूहाने या पुलाची चोरी केली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार या पुलाची निर्मिती बऱ्याच वर्षांपूर्वी झाली होती. हा पूल स्टीलचा बनवण्यात आला होता. हा पूल Murmansk या ठिकाणी आहे. या पुलाची लांबी २३ मीटर आहे. तर याचे वजन ५६ टन इतके आहे.

पोलिसांना अशी शंका आहे की ही चोरी याच्या मालकांनीच केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. संपूर्ण पूल चोरी असतानाही तेथील स्थानिक लोकांना याची खबर नव्हती. पोलिसांच्या मते, पुलाचे सर्व लोखंड पाण्यात खेचण्यात आले. त्यानंतर याचे तुकडे तुकडे करण्यात आले. यानंतर हे चोर सर्व स्टील घेऊन गेले. पोलीस चोरांचा शोध घेत आहे. अनेकदा चोरीच्या घटना आपण ऐकत असतो. मात्र हे चोर गरजेपेक्षा अधिकच मेहनती निघाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
एका रात्रीत गायब झाला ७५ फूट उंचीचा संपूर्ण पूल, पाहा कुठे घडली ही घटना Description: रशियामध्ये संपूर्ण पूल गायब झाला असल्याची हैराण करणारी बातमी समोर आली आहे. लोकांच्या मते हा पूल चोरी करण्यात आला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola