Viral VIDEO: हॉकी कोर्टात 'या' देशाचे राष्ट्राध्यक्ष तोंडावरच आपटले!

व्हायरल झालं जी
Updated May 13, 2019 | 17:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचा आइस हॉकी खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. पाहा यावेळी पुतिन यांच्यासोबत नेमकं काय झालं.

putin_youtube
हॉकी कोर्टा ब्लादिमीर पुतिन (Video Grab)  |  फोटो सौजन्य: YouTube

मॉस्को: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचा आइस हॉकी खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. हॉकी खेळत असल्याचा हा व्हिडिओ रशियातील अनेक नागरिकांना बराच आवडला देखील आहे. यावेळेस त्यांचं आइस हॉकीचं स्किल देखील पाहायला मिळालं. एवढंच नव्हे तर त्यांनी सामन्यात अनेक गोलही केले. पुतिन हे आइस हॉकीचे मोठे चाहते आहेत. त्यामुळेच ते अनेकदा हॉकी कोर्टावर देखील दिसून येतात. 

यावेळेस देखील पुतीन हे आइस हॉकीसाठी आवश्यक असा पोशाख परिधान करुन दुसऱ्या अधिकाऱ्यांसोबत हॉकी खेळताना दिसून आले. या हॉकी मॅचचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. पुतिन हे एका इनडोअर ट्रेनिंग स्टेडियममध्ये महिला अधिकाऱ्यांसोबत हॉकी खेळताना दिसून येत आहेत. ब्लादिमीर पुतिन हे जगभरातील शक्तीशाली नेत्यांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांचा हॉकी कोर्टातील बिनधास्त वावर पाहून सगळेच अधिकारी देखील बरेच खुश झाले. 

पुतिन हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या वेळेस देखील ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळेस ते आईस हॉकी कोर्टावरील एका वेगळ्याच गोष्टीमुळे पुतिन यांच्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. त्याचं झालं असं की, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी पुतिन हे आपल्या महिला अधिकाऱ्यांसोबत आइस हॉकी खेळत होते. अशा पद्धतीने थेट हॉकी कोर्टमध्ये उतरल्याने त्यांची जनमानसातील प्रतिमा आणखी उंचावली गेल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. पण याच व्हिडिओमध्ये असं काही घडलं की, हा व्हिडिओ व्हायरलच झाला. 

 

 

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात की, हॉकी मॅचमध्ये गोल केल्यानंतर ते स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी रेड कार्पेटवरून फिरत होते. पण याच वेळी पुतिन यांचा तोल गेला हे थेट तोंडावरच खाली पडले. ६६ वर्षीय पुतिन यांचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत अनेक लोकांनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. 

पुतिन हे खाली पडल्याचं पाहताच त्यांचे सुरक्षा रक्षक हे तात्काळ त्यांना उचलण्यासाठी पुढे सरसावले. पण पुतिन हे स्वत:हून उठले आणि पुन्हा एकदा कोर्टमध्ये स्केटिंग करु लागले. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मॅचदरम्यान पुतिन यांनी तब्बल आठ गोल केले. त्यांच्या याच कामगिरीच्या जोरावर त्यांच्या संघाने सामना जिंकत चषकही पटकावला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Viral VIDEO: हॉकी कोर्टात 'या' देशाचे राष्ट्राध्यक्ष तोंडावरच आपटले! Description: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचा आइस हॉकी खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. पाहा यावेळी पुतिन यांच्यासोबत नेमकं काय झालं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola