Special Wedding : गेल्या काही महिन्यांतील जागतिक घडामोडी पाहता रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine) हे दोन शब्द वारंवार सर्वसामान्यांच्या कानावर पडतात. मात्र हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर येतो तो रक्तपात, युद्ध, किंकाळ्या, गरीबी, बेघर झालेले लोक, जागतिक तणाव वगैरे गोष्टी. नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं मात्र या दोन शब्दांकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन भारतीयांना दिला. घटनाच तशी होती. रशिया आणि युक्रेन या दोन युद्धग्रस्त देशातील एक जोडपं (Couple) एकमेकांवर निरतिशय प्रेम करत होतं. युद्धाच्या वातावरणातही या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम टिकून राहिलं. केवळ टिकूनच राहिलं नाही, तर ते वाढतच गेलं आणि या दोघांनी एकमेकांशी लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला.
रशियाचा नागरिक असणारा सर्गेई नोविकोव्ह आणि युक्रेनची नागरिक एलोना ब्रामोका हे गेल्या काही महिन्यांपूर्वी एकमेकांना भेटले आणि त्यांची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे या दोघांचं लग्न ठरत होतं, तर दुसरीकडे त्यांचे मायदेश एकमेकांशी युद्ध करायला सज्ज होत होते. आता काय करावं, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. युद्धजन्य परिस्थितीत या दोन देशातील नागरिक म्हणून एकमेकांशी लग्न करणं हेदेखील कठीण होतं. त्या वेळच्या दोन्ही देशातील नागरिकांच्या भावना एकमेकांविषयी आक्रमक होत्या. त्यामुळे रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश सोडून वेगळ्याच ठिकाणी जाण्याचा आणि तिथं शांततेनं लग्न करण्याचा निर्णय़ या दोघांनी घेतला.
लग्न करण्यासाठी या दोघांनी भारताची निवड केली. भारतातील हिमाचल प्रदेशमध्ये दोघं आले आणि त्यांनी धर्मशाला या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी भारतीय पद्धतीनंच एकमेकांशी लग्न करण्याचं ठरलं आणि त्यांनी तयारी सुरू केली. काही मित्रमंडळींना त्यांनी लग्नाला बोलावलं पण युद्धजन्य परिस्थितीमुळे फारसं कुणी या लग्नाला येऊ शकलं नाही.
अधिक वाचा - Man Carrying Python Video : खांद्यावर अजगर ठेवून खेचत होता माणूस, व्हिडीओ झाला व्हायरल
या दोघांनी धर्मशालामध्ये हिंदू पद्धतीनं लग्न केलं. अग्निभोवती सात फेरे घेणे, एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घालणे, पतीने पत्नीला मंगळसूत्र घालणे, पत्नीच्या भांगेत कुंकू भरणे असे सगळे सोपस्कार पार पाडले आणि हे दोघं एकमेकांचे पती-पत्नी झाले.
अधिक वाचा - Optical Illusion: खेळण्यांमध्ये लपला आहे खरा घुबड, शोधून दाखवा ५ सेकंदात
या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. भारतीय पद्धतीनं झालेलं रशियन आणि युक्रेनियन जोडप्याचं लग्न हा सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. युजर्सनी या जोडप्याचं भारतात जोरदार स्वागत केलं असून त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.