सचिन तेंडुलकरचं भन्नाट जजमेंट

Sachin Tendulkar excellent judgment : सचिनचे 'जजमेंट' फक्त क्रिकेट पुरतेच मर्यादीत नाही. इतर बाबतीतही त्याचे 'जजमेंट' कौतुकास्पद असे असल्याचे दिसते. 

Sachin Tendulkar excellent judgment
सचिन तेंडुलकरचं भन्नाट जजमेंट 
थोडं पण कामाचं
  • सचिन तेंडुलकरचं भन्नाट जजमेंट
  • क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झालेला सचिन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
  • सचिनने फेसबुकवर पोस्ट केलेला व्हिडीओ अनेकांनी बघितला आणि लाइक, शेअर केला

Sachin Tendulkar excellent judgment : मुंबई : क्रिकेटविश्वात ज्याला देव मानलं जातं असा विश्वविक्रमादित्य खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. भारतरत्न असलेला हा मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू मैदानात भन्नाट खेळण्यासाठी प्रसिद्ध होता. खेळाडू म्हणून निवृत्त झाला तरी त्याने केलेल्या अनेक खेळी आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. आखातात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमधील त्याच्या वादळी खेळीचे कौतुक करताना चाहत्यांना शब्द कमी पडतात. असा हा खेळाडू फलंदाजी करताना गोलंदाजाचे आणि मैदानात उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकांचे 'जजमेंट' घेऊन चेंडू असा काही टोलवायचा की बघणारे चक्रावून जायचे. पण सचिनचे 'जजमेंट' फक्त क्रिकेट पुरतेच मर्यादीत नाही. इतर बाबतीतही त्याचे 'जजमेंट' कौतुकास्पद असे असल्याचे दिसते. 

व्हायरल झालं जी

क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झालेला सचिन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. अधूनमधून सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो. त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाइक आणि शेअर केले आहे. 

फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत सचिन तेंडुलकर मित्रांसाठी कॉफी तयार करत असल्याचे दिसत आहे. तीन कप कॉफी करण्यासाठी तो कपमध्ये गरम पाणी घेतो. केटलमध्ये (पाण्याचे मोठे भांडे / water kettle) किती पाणी आहे हे माहिती नसताना सचिन तीन कपमध्ये पाणी ओततो. प्रत्येक कपमध्ये स्वतःच्या अंदाजाने पाणी ओततो. नंतर हे तिन्ही कप एकमेकांच्या जवळ ठेवून दाखवतो. तिन्ही कपमध्ये एकसमान पातळी एवढेच पाणी दिसते. सचिनच्या या 'जजमेंट'चे व्हिडीओ बघणाऱ्यांकडून कौतुक होत आहे.

सहकारी आणि प्रतिस्पर्धी यांचे 'जजमेंट' घेऊन क्रिकेटचे मैदान गाजविणारा सचिन निवृत्ती नंतर कॉफी करण्याच्या कामातही आपल्या अचूक 'जजमेंट'ची झलक दाखवतो याचे त्याच्या चाहत्यांना कौतुक वाटत आहे. अल्पावधीत अनेकांना हा व्हिडीओ बघून लाइक आणि शेअर केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी