पंधरा वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहणाऱ्या सरपंचानांनी तिघींशी बांधली लगीनगाठ, एकाच मंडपात घेतलं सातफेरे

प्रेम मिळवण्यासाठी आपल्याला किती घ्यावी लागते, याची कल्पना आपल्याला आहे. परंतु मध्य प्रदेशतील ( Madhya pradesh ) अलीराजपूरच्या एका गावातील सरपंचाला एक नाही तर थेट तीन प्रेयसी मिळाल्या आहेत. शिवाय या तिन्ही प्रेयसी पंधरा वर्षापासून एकत्र राहत होत्या.

 Witnessing six children, Sarpanch married 3 lovers
सहा मुलांच्या साक्षीने सरपंचाने 3 प्रेयशींशी केलं लग्न   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • तिन्हींनी एकाच मंडपात आपला प्रियकर असलेल्या माजी सरपंचाशी लग्न केलं.
  • नानपूर गावाचे माजी सरपंच समरथ मौर्य यांनी तीन प्रेयसींशी केलं लग्न

अलीराजपूर : प्रेम मिळवण्यासाठी आपल्याला किती घ्यावी लागते, याची कल्पना आपल्याला आहे. परंतु मध्य प्रदेशतील ( Madhya pradesh ) अलीराजपूरच्या एका गावातील सरपंचाला एक नाही तर थेट तीन प्रेयसी मिळाल्या आहेत. शिवाय या तिन्ही प्रेयसी पंधरा वर्षापासून एकत्र राहत होत्या. तिन्हींनी एकाच मंडपात आपला प्रियकर असलेल्या सरपंचाशी लग्न केलं. हे अगळ-वेगळं लग्न पाहून अनेकजण चक्रावले आहेत.  या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे

या माजी सरपंचाने एकाच मंडपात 15 वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहत असलेल्या आपल्या 3 गर्लफ्रेंडसोबत बाहुल्यावर चढला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यास त्यांचे 6 मुले देखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे लग्नपत्रिकेत तिन्ही गर्लफ्रेंडची नावेदेखील प्रसिद्ध करण्यात आले होते.  एका नवरदेव, तीन वधू याच्या लग्नाला साक्षी झाली त्यांची 6 मुलेनानपूर गावाचे माजी सरपंच समरथ मौर्य यांनी आपल्या तीन गर्लफ्रेंड नानबाई, मेला आणि सकरी यांच्याशी एकाच मंडपात विवाह केला. समरथ यांनी सांगितले की, या तिन्ही महिलांसोबत त्यांना वेगवेगळ्या वेळी प्रेम झाले. 15 वर्षांपासून ते आपल्या प्रेमिकांसोबत लिव-इनमध्ये राहत आहेत. समरथ यांना 6 मुले आहेत. 15 वर्षापूर्वी आर्थिक स्थिती खराब असल्याने त्यावेळी आपण तिन्ही प्रेमिकांसोबत विवाह करू शकलो नाही. आता आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, असे समरथ यांनी संगितले. समरथ यांच्याजवळ शेती आहे.

marriage

नुकतेच त्याने आदिवासी परंपरेनुसार तिन्ही प्रेमिकांशी विवाह केला.दरम्यान, समरथ 35 वर्षाचा असून त्याची पत्नी नानबाई 33 वर्षे वयाची आहे. तिला 4 मुलं आहेत. यात 3 मुली आणि 1 मुलगा आहे. दुसरी पत्नी मेलाबाई ही 29 वर्षाची असून तिला एक मुलगा आहे. तर तिसरी पत्नी सकरीबाई ही 28 वर्षाची असून तिच्याकडून देखील समरथ याला एक मुलगा झाला आहे. त्यानुसार समरथ याला एकूण 6 मुले आहे. समरथने सांगितले की, आदिवासी भिल्ल समाजात लिव इनमध्ये राहणे आणि मुलांना जन्म देण्याची सूट आहे. मात्र, लग्न न करता परिवारातील कोणत्याही सदस्याला शुभ कार्यात सहभागी होण्याची परवानगी नसते. यामुळे आपण तिन्ही प्रेमिकांशी विवाह केल्याचे समरथ याने संगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी