सौदी अरेबियात उंटांसाठी पंचतारांकीत हॉटेल

Saudi Arabia : First Camel Hotel with Full Services : तेलसंपन्न सौदी अरेबियात (Saudi Arabia) उंटांसाठी पंचतारांकीत हॉटेल बांधण्यात आले आहे. सहाव्या किंग अब्दुल अझीझ कॅमल फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या उंटांसाठी पंचतारांकीत हॉटेल बांधण्यात आले आहे. हे जगातील पहिले उंटांसाठीचे पंचतारांकीत हॉटेल आहे.

Saudi Arabia : First Camel Hotel with Full Services
सौदी अरेबियात उंटांसाठी पंचतारांकीत हॉटेल 
थोडं पण कामाचं
  • सौदी अरेबियात उंटांसाठी पंचतारांकीत हॉटेल
  • जगातील पहिले उंटांसाठीचे पंचतारांकीत हॉटेल
  • सहाव्या किंग अब्दुल अझीझ कॅमल फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या उंटांसाठी पंचतारांकीत हॉटेल

Saudi Arabia : First Camel Hotel with Full Services : रियाध (Riyadh) : तेलसंपन्न सौदी अरेबियात (Saudi Arabia) उंटांसाठी पंचतारांकीत हॉटेल बांधण्यात आले आहे. सहाव्या किंग अब्दुल अझीझ कॅमल फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या उंटांसाठी पंचतारांकीत हॉटेल बांधण्यात आले आहे. हे जगातील पहिले उंटांसाठीचे पंचतारांकीत हॉटेल आहे.

सौदी अरेबियातील उंटांसाठीच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये १२० खोल्या आहेत. टेटामन (Tetaman) नावाने अर्थात खात्रीशारी विश्रांतीसाठी (Rest Assured) उंटांची व्यवस्था पंचतारांकीत हॉटेलमध्ये केली जाते. हॉटेलमधील उंटांच्या वास्तव्याचा खर्च त्यांचे मालक करतात. हॉटेलमध्ये उंटांना पौष्टिक आहार, पाणी, दूध, आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार दिले जातात. उंटांच्या विश्रांतीसाठी हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था आहे. या हॉटेलमध्ये ५० कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या या हॉटेलमध्ये उंटांसाठी प्रति रात्र सुमारे शंभर डॉलर आकारले जात आहेत. 

दरवर्षी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे होणाऱ्या ४० दिवसांच्या उंटांच्या महोत्सवासाठी जगभरातून उंट येतात. यात प्रामुख्याने आखाती देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, रशिया या देशांतून उंट त्यांच्या मालकांसोबत येतात. महोत्सवासाठी आलेल्या उंटांची व्यवस्था उंटांसाठीच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये केली जाते. उंटांच्या मालकांची व्यवस्था रियाधमधील अन्य पंचतारांकीत हॉटेलमध्ये केली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी