Viral Video : सौदी अरेबियाच्या गायकाने गायले 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा', व्हिडिओने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

Saudi Viral Video : भारताने नुकतीच आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे मोठ्या थाटामाटात साजरी केली. यानिमित्ताने देश आणि जगातून भारतावर अनेक अभिनंदनाचा वर्षाव झाला. अनेक देशांमधून भारताचे राष्ट्रगीत देखील गायले गेले. आता असाच एक व्हिडिओ सौदी अरेबियातून (Saudi Arabia) समोर आला आहे ज्यात एक गायक "सारे जहाँ से अच्छा" हे देशभक्तीपर गाणे अतिशय गोंडस पद्धतीने गातो आहे. सौदी अरेबियाच्या गायकाने गायलेले हे गाणे इंटरनेटवर लक्ष वेधून घेते आहे. या गायकाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.

Saudi singer viral video
सौदी अरेबियाच्या गायकाचा व्हायरल व्हिडिओ 
थोडं पण कामाचं
  • भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त अनेक देशांमधून भारताचे राष्ट्रगीत देखील गायले गेले.
  • सौदी गायक "सारे जहाँ से अच्छा" हे देशभक्तीपर गाणे अतिशय गोंडस पद्धतीने गाताना व्हिडिओ व्हायरल
  • सौदी अरेबियाचे नागरिक हाशिम अब्बास हे यूट्यूब, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या गाण्यांसाठी खूप प्रसिद्ध

Viral Video :नवी दिल्ली : भारताने नुकतीच आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे मोठ्या थाटामाटात साजरी केली. यानिमित्ताने देश आणि जगातून भारतावर अनेक अभिनंदनाचा वर्षाव झाला. अनेक देशांमधून भारताचे राष्ट्रगीत देखील गायले गेले. आता असाच एक व्हिडिओ सौदी अरेबियातून (Saudi Arabia) समोर आला आहे ज्यात एक गायक "सारे जहाँ से अच्छा" हे देशभक्तीपर गाणे अतिशय गोंडस पद्धतीने गातो आहे. सौदी अरेबियाच्या गायकाने गायलेले हे गाणे इंटरनेटवर लक्ष वेधून घेते आहे. या गायकाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. पाहूया कोण आहे हा गायक आणि नेमके त्याने काय केले आहे. (Saudi singer Hashim Abbas singing for Indian Independence day video goes viral)

अधिक वाचा : Sovereign Gold Bond : स्वस्तात मिळवा सोने, गुंतवणुकीची सुवर्णसंधी, 22 ऑगस्टपासून...जाणून घ्या

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बनवला व्हिडिओ

स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सौदी अरेबियाचे नागरिक हाशिम अब्बास हे यूट्यूब, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या गाण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यावर सुंदर अरबी उच्चारात "सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा" गायले आहे. हा व्हिडिओ त्याने त्याच्या इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

अधिक वाचा : Railway Bridge: मुसळधार पावसाचा फटका; रेल्वे पूल कोसळला, पुरात वाहून गेला खांब, Watch Video

अरबी भाषेतील गाणे

अरबी भाषेत गायलेले भारताचे हे देशभक्तीपर गीत यूट्यूबवर जवळपास तीन लाख लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओमध्ये हाशिम अब्बास उंटांसोबत सौदी अरेबिया आणि भारताचे राष्ट्रध्वजांसोबत दिसत आहेत. त्याने पारंपारिक अरबी कपडे घातले आहेत. प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार अब्बास एका मोठ्या भारतीय आयटी कंपनीमध्ये एचआर सल्लागार म्हणून काम करतात.

भारताच्या प्रेमात हाशिम अब्बास

हाशिम अब्बास यांनी भारताविषयी प्रेम व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांनी भारताचे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीतही गायले होते. 26 जानेवारी 2021 रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी ते प्रसिद्ध केले. आता भारताच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनी, हाशिम अब्बास यांनी पुन्हा एकदा khajoor.net निर्मित 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' पुन्हा गायले आहे. हाशिम अब्बास यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, "माझ्या दुसरे घर असलेल्या भारताला आणखी एक अद्भुत भेट." हाशिमने त्याचा व्हिडिओ "स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा" आणि "जय हिंद" ने संपवला.

अधिक वाचा : Maharashtra Rain: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचं वादळात रुपांतर, राज्यात पावसाचा जोर वाढणार

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यंदा मोठी धूमधाम होती. संपूर्ण देशभर या गोष्टीचा जल्लोष आणि उत्साह होता. जगानेदेखील भारताच्या स्वातंत्र्यदिनाची दखल घेतली. अनेक ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अनेक गोष्टी केल्या गेल्या. परदेशात असलेल्या भारतीयांमुळे तेथील स्थानिकांनादेखील भारतीय संस्कृती आणि भारताची चांगली ओळख पटते आहे. यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला आणखी भव्यता आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी