भयंकर व्हिडिओ! सापासारख्या दिसणाऱ्या ईल माशाला क्षणार्धात या माशाने गिळले

सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेक लोकांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या नंदा यांच्याकडून अनेकांनी अधिक माहिती मागितली आहे तर काहींना मात्र हा व्हिडिओ खोटा वाटत आहे.

Fish swallows eel fish
भयंकर व्हिडिओ! सापासारख्या दिसणाऱ्या ईल माशाला क्षणार्धात या माशाने गिळले  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • कार्प माशाने भलीमोठी ईल गिळली
  • यूजर्सनी नंदा यांच्याकडे मागितली अधिक माहिती
  • मूळ यूट्यूब व्हिडिओवरची लिंकही केली पोस्ट

सोशल मीडियात (Social media) जगातील अनेक अजब व्हिडिओ (wondrous videos) चर्चेत येत असतात. गेल्या काही दिवसांपासून मात्र एक वेगळाच व्हिडिओ इंटरनेटच्या जगात (internet world) प्रसिद्ध होत आहे. यात एक मासा (fish) एका ईलला (eel) गिळताना दिसत आहे. इतक्या मोठ्या ईलला हा मासा कसा काय गिळतो आहे याबद्दल लोक आश्चर्य (amazement) व्यक्त करत आहेत. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात त्यांनी फक्त इतकेच लिहिले होते, ‘जर आपण पाहिले नसेल तर…’

कार्प माशाने भलीमोठी ईल गिळली

या विचित्र व्हिडिओमध्ये एक मासा, ज्याची ओळख कार्प मासा अशी पटली आहे तो आपले डोके पाण्याच्या बाहेर काढतो आणि अचानक धूर सोडू लागतो. नंतर तो पुन्हा आत जातो आणि बाहेर येऊन ईल माशाला गिळून टाकतो.

बातमी लिहीत असताना हा व्हिडिओ ट्विटरवर 2 लाखपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. एका यूजरने लिहिले आहे, ‘मला याचा पूर्ण व्हिडिओ दाखवा. या व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, ‘काय? माशाला धूर सोडताना मी पहिल्यांदाच पाहिले आहे.’

यूजर्सनी नंदा यांच्याकडे मागितली अधिक माहिती

सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ लोकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. त्यासाठी अनेक लोकांनी नंदा यांच्याकडे या व्हिडिओबद्दल अधिक माहिती मागितली आहे. तर काही यूजर्सनी हा व्हिडिओ पासून तो नकली असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की या माशाच्या हालचाली पूर्णपणे अनैसर्गिक वाटत आहेत. एका यूजरने लिहिले आहे, ‘हा पूर्णपणे खोटा व्हिडिओ वाटत आहे. सुशांत नंदा यांना हे कसे कळले नाही याबद्दल मला आश्चर्य वाटत आहे.’

मूळ यूट्यूब व्हिडिओवरची लिंकही केली पोस्ट

अनेक यूजर्सनी यामागे असा तर्क दिला आहे की आपण या माशाच्या हालचाली लक्षपूर्वक पाहिल्यात तर आपल्याला त्या अनैसर्गिक वाटतील. लोकांनी हा व्हिडिओ पैसे कमावण्यासाठी शूट केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एका अन्य यूजरने मूळ यूट्यूबची लिंकही पोस्ट केली आहे जिथे आत्तापर्यंत 27 मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी