[VIDEO] शाळेतल्या मुला-मुलीचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल! 

Viral Video: सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतो आहे की, जो पाहून तुम्ही देखील थक्क होऊन जाल. कारण की, हा व्हिडिओ दोन शाळेतील मुलांचा आहे. 

trending video grab
[VIDEO] शाळेतल्या मुला-मुलीचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दोन शालेय विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
  • रस्त्यावर स्टंट करताना दिसतायेत दोन विद्यार्थी
  • यूजर्सने सोशल मीडियावर क्रीडा मंत्र्यांना मुलांना प्रशिक्षण मिळावं यासाठी केलं आवाहन

मुंबई: कुणीतरी खरंच म्हटलं आहे की, ईश्वर कुणाला काय गुण देईल हे त्याचं त्यालाच ठाऊक. त्यामुळे असं अजिबात नाही की, प्रतिभावान लोकं ही फक्त मोठ्या शहरात किंवा मोठ्या अकॅडमीमध्येच घडतात. तर, अनेक प्रतिभावान लोकं ही छोट्या-छोट्या गावांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे अगदी खरंच आहे. कारण की, एक अशी घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोन शाळेतील विद्यार्थी रस्त्यातच स्टंट करताना पाहायला मिळाले आहेत. पण ते स्टंट काही साधेसुधे नव्हेत तर एखाद्या जिम्नास्टिकला लाजवेल असे परफेक्ट होते. 

बा व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन शाळेतील विद्यार्थी एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावरच फ्लिप जंप करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, पहिले मुलगा उडी मारतो आणि त्यानंतर मुलगी उडी मारते. या दोन्ही शालेय विद्यार्थ्यांची प्रतिभा पाहून असं वाटतं की, ते अगदी प्रशिक्षित जिम्नास्टिक खेळाडू आहेत. 

ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर २१ हजारांहून अधिक जणांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत प्रचंड प्रतिक्रिया आल्या आहेत. एका यूजरनं असं म्हटलं आहे की, 'जर भारत या अद्भुत मुलांमध्ये गुतंवणूक करु शकला असता आणि ही मुलं जागतिक स्तरावर खेळली असती. त्यांना माझ्याकडून भरपूर प्रेम.' 

दुसरीकडे एका यूजरने केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना टॅग करुन असं म्हटलं आहे की, 'किरेन रिजिजू जी, कृपया हे पाहा. जर इतक्या लहान वयातच त्यांना योग्य गोष्टी पुरवल्या तर पुढे जाऊन ही मुलं देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील.' पण असं असलं तरी हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. जो मध्यप्रदेशमधील होता. ज्यामध्ये एक युवक अनवाणी पायाने १०० मी. शर्यत पूर्ण करताना दिसला होता. हैराण करणारी गोष्ट ही त्या तरुणाने अवघ्या ११ सेंकदात शर्यत पूर्ण केली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करुन असं म्हटलं होतं की, 'मी तुम्हाला अपील करतो की, कुणी तरी या तरुणाला माझ्याकडे घेऊन या. मी याला अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देण्याची सोय नक्कीच करेन.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...