School kids on roof top of Auto: सोशल मीडियात कधी कुठला व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. आता सोशल मीडियात एका रिक्षाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसत आहे की, रिक्षाच्या छतावर तीन शाळकरी मुले बसले आहेत आणि रस्त्यावरुन भरधाव वेगाने ऑटो धावत आहे. (school kids sit on roof of auto rickshaw and drive shocking video viral watch)
त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइल फोनमध्ये ही दृष्य कैद केली आणि सोशल मीडियात व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर अक्षरश: काटा येईल.
How can someone send their children to school with such a careless auto driver. Visuals from UP's Bareilly. This auto crossed office of RTO, Nakatia police outpost on Friday but everyone seemed to be sleeping. No action taken with registration no. UP25ET8342 by@Uppolice pic.twitter.com/hcfidtIJFS — Raj Kumar Bhim Army (@Rajkuma79883678) August 28, 2022
हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील बरेली येथील असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कशा प्रकारे ऑटो ड्रायवरने आपल्या रिक्षाच्या छतावर शाळकरी मुलांना बसवून गाडी चालवत आहे. हे मुलांसाठी खूपच धोकादायक आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच बरेली येथे अज्ञात ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडिया युजर्सने या रिक्षाचालकाच्या बेपर्वा वागण्याबद्दल आणि मुलांचा जीव धोक्यात टाकल्याबद्दल टीका केली आहे.
हे पण वाचा : चूरमाचे स्वादिष्ट लाडू बनवण्याची सोपी रेसिपी
हा व्हिडिओ एका ट्विटर युजरने आपल्या अकाऊंटवरुन शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'उत्तरप्रदेशातील बरेलीतील ही दृश्य आहेत. इतक्या निष्काळजीपणाने रिक्षाचालकाने मुलांना शाळेत कसं घेऊन जाऊ शकतो. ही रिक्षा शुक्रवारी आरटीओ कार्यालय नकाटिया पोलीस चौकी येथून गेली मात्र, कुणाचंच याकडे लक्ष गेलं नाही. इतकेच नाहीतर रजिस्टर्ड नंबर प्लेटच्या चालकावरही कोणतीही कारवाई केलेली नाहीये'.
जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा, बरेली पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत कलम 279 अंतर्गत रॅश ड्रायव्हिंगनुसार एफआयआर दाखल केला आहे. बरेली पोलिसांनी ट्विट करत म्हटलं, 'ऑटोरिक्षा चालकावर दंडासह नियमानुसार कारवाई सुरू केली आहे. संबंधित मुले आणि त्यांच्या पालकांसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहे.'