शाळेतील शिक्षकालाच भाषांतर येईना; 'मी शाळेत जात आहे' हे इंग्रजीत बोलताना मास्तराला सुटला घाम, व्हिडिओ पहा

मुलं शिकावीत यासाठी पालक आपल्या मुलांन शाळेत पाठवत असतात. शाळेतील शिक्षक त्यांनी ज्ञान देतील आणि त्याचा मुलांना फायदा होईल. परंतु जर शाळेतील शिक्षकांनाच काही येत नसेल तर, मग विद्यार्थ्यांना कशाप्रकारे चांगले ज्ञान मिळेल. सध्या अनेक शाळेतील मास्तरांनाच पुरेसं ज्ञान नसल्यानं ते विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या खड्ड्यात ढकलत आहेत.

The teacher broke out in a sweat as he spoke in English
'मी शाळेत जात आहे' हे इंग्रजीत बोलताना शिक्षकाला सुटला घाम  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मुख्याध्यापकांना 'मी शाळेत जात आहे'चे इंग्रजीत भाषांतर करण्यास सांगितले.
  • बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील शाळेत शिक्षकांनाच प्रश्नांची उत्तर देता येईना

Bihar School Headmaster Failed To Answer: मुलं शिकावीत यासाठी पालक आपल्या मुलांन शाळेत पाठवत असतात. शाळेतील शिक्षक त्यांनी ज्ञान देतील आणि त्याचा मुलांना फायदा होईल. परंतु जर शाळेतील शिक्षकांनाच काही येत नसेल तर, मग विद्यार्थ्यांना कशाप्रकारे चांगले ज्ञान मिळेल. सध्या अनेक शाळेतील मास्तरांनाच पुरेसं ज्ञान नसल्यानं ते विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या खड्ड्यात ढकलत आहेत. बिहारमधील एका शाळेतील शिक्षक हेच पाप करत आहे. या शिक्षकाला साधं एक वाक्य  इंग्रजीत बोलता येत नसल्याचं लक्षात आलं आहे.    

दरम्यान, शिक्षण अधिकारी खासगी आणि सरकारी शााळेतील विद्यार्थ्यांचे आणि शाळांचे निरीक्षण करण्यास येत असतात. त्यावेळी ते अधिकारी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना असे प्रश्न विचारत असतात, ज्यांची उत्तरे त्यांना माहिती असणं आवश्यक असतं.  
असाच काहीसा प्रकार बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात पाहायला मिळाला, जेव्हा एसडीओ शाळेत पोहोचले आणि शिक्षकांना साधे प्रश्न विचारले. यावेळी शिक्षकांच्या चुकीच्या आणि भन्नाट उत्तराने लोक अचंबित झाले.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बिहारच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एसडीओ अधिकाऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाहीत शिक्षक 

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एसडीओने शाळेच्या मुख्याध्यापकांना 'मी शाळेत जात आहे'चे इंग्रजीत भाषांतर करण्यास सांगितले, त्याचे उत्तर देताना मास्तरनं बोलणं थांबवले आणि उलट-सुलट उत्तरं देऊ लागला. इतकंच नाही तर शाळेच्या वर्गात प्रवेश करताच त्याने शिक्षकाला असा प्रश्न विचारला ज्याचा अर्थही त्याला माहीत नव्हता. वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांसमोर एसडीओने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शिक्षक देऊ शकले नाहीत. त्यांनी वर्गातील शिक्षकाला विचारले की वातावरण आणि हवामान यात काय फरक आहे? याचे उत्तरही शिक्षकांकडे नव्हते.

वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांनाही विचारण्यात आला प्रश्न 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोतिहारी जिल्ह्यातील पाकडीदयाल भागात गुरुवारी हा प्रकार घडला. एसडीओ कुमार रवींद्र शाळांमध्ये तपासणीसाठी पोहोचले. त्यांनी वर्गात प्रवेश करत मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकाला प्रश्न केला की, 'वातावरण आणि हवामान यात काय फरक आहे?' या प्रश्नाचं उत्तर मास्तर देऊ शकला नाही. यानंतर एसडीओने केवळ शिक्षकांनाच नाही तर मुलांनाही तोच प्रश्न करण्यात आला.

Read Also : शिंदे सरकार टिकणार का बुडणार; सर्वोच्च न्यायलयात आज सुनावणी

त्याचवेळी, एसडीओने शाळेच्या मुख्याध्यापकांना इंग्रजी भाषांतराचा प्रश्न विचारल्याचेही दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. मोतिहारीच्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या मुलाखतीत प्राचार्य सर नापास झाल्या दिसत आहे. मुख्याध्यापकांना साधं वाक्य इंग्रजी भाषांतर करता न आल्यानं शिक्षण प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.    शाळेच्या मुख्याध्यापकांची ही अवस्था आहे तर विद्यार्थ्यांना काय येत असेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो. 

Read Also : भगवान वामन यांच्या आशीर्वादाने घरात नांदेल सुख, शांती

मुख्याध्यापकांना करता नाही आले इंग्रजी भाषांतर 

मुख्याध्यापकांना 'मी शाळेत जात आहे' चे इंग्रजी भाषांतर विचारले, त्याच उत्तर देऊ शकले नाहीत. एवढेच नाही तर एसडीओने संस्कृतमध्येही अनुवाद करण्यास सांगितले, मात्र तेही मुख्याध्यापकांना सांगता आले नाही. यानंतर एसडीओनेच भाषांतर कसे केले जाते ते सांगितले. लोक हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल करत आहेत आणि शिक्षकांची अशी अवस्था असताना शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळणार, असा सवाल उपस्थित करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी