विज्ञाननं 'या' महिलेला सांगितलं जगातली सर्वात सुंदर स्त्री..!, कोण आहे ती महिला

या जगात सर्वात सुंदर (Most Beautiful Woman) महिला कोण आहे? हा प्रश्न नेहमीच सर्वानाच पडला असतो. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जगभरात विविध स्पर्धांचं आयोजनही केलं जातं.

Amber Heard
Amber Heard  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • या जगात सर्वात सुंदर (Most Beautiful Woman) महिला कोण आहे?
  • मिस वर्ल्डपासून मिस यूनिव्हर्ससारख्या स्पर्धा जगभरातल्या सर्वांत सुंदर महिलांना शोधण्यासाठी आयोजित करण्यात येत असतात.
  • ज्या पद्धतीच्या आधारावर एखाद्याचं सौंदर्य मोजण्यात येतं.

नवी दिल्ली: या जगात सर्वात सुंदर (Most Beautiful Woman) महिला कोण आहे? हा प्रश्न नेहमीच सर्वानाच पडला असतो. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जगभरात विविध स्पर्धांचं आयोजनही केलं जातं. मिस वर्ल्डपासून मिस यूनिव्हर्ससारख्या (Miss World to Miss Universe) स्पर्धा जगभरातल्या सर्वांत सुंदर महिलांना शोधण्यासाठी आयोजित करण्यात येत असतात. दरम्यान विज्ञानात एक पद्धत आहे. ज्या पद्धतीच्या आधारावर एखाद्याचं सौंदर्य मोजण्यात येतं. हे तंत्र म्हणजे फेशियल मॅपिंग (Facial Maping Tecnique) तंत्र.

या तंत्रात असं काही आहे, ज्याच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचं सौंदर्य मोजता येतं. एका ब्रिटीनच्या एका सर्जननं या तंत्राचा वापर करुन जगातील सर्वात सुंदर महिलेची माहिती दिली आहे. यावरुनच एक प्रकारे विज्ञानाच्या आधारावर जगातील सर्वांत सुंदर महिलेबद्दल माहिती समोर आली आहे. ब्रिटीनच्या सर्जननं (British Surgeon) विज्ञानाच्या आधारावर जगातील सर्वांत सुंदर महिला म्हणून ज्या महिलेचं नाव घेतलं आहे ती महिला आहे अमेरिकन अभिनेत्री एम्बर (Amber Heard)हर्ड. 

अमेरिका अभिनेत्री एम्बर हर्ड आहे जगातील सर्वांत सुंदर महिला 

एम्बर हर्ड गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या हेडलाईनमध्ये वारंवार दिसून येत आहे. एम्बर सध्या तिचा पूर्व पती जॉनी डेप याच्यासोबत सुरु असलेल्या खटल्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ती पतीसोबतचा खटला हरली सुद्धा आहे, जी तिच्यासाठी खूपच वाईट गोष्ट आहे. 

याच दरम्यान तिच्या चेहऱ्याला विज्ञानाच्या आधारावर जगभरातला सर्वांत सुंदर चेहरा सांगितला आहे. ही बाब एम्बर हर्डसाठी सर्वांत आनंदाची गोष्ट आहे. ब्रिटीनच्या सर्जननं ग्रीक रेशिओ ऑफ फी मध्ये एम्बरच्या चेहऱ्यावरील 11 पॉईंट्स मार्क करुन सांगितलं की, ती कशी जगभरातील सर्वांत सुंदर महिला आहे. 

यात सर्जननं एम्बर हर्डचे डोळे, नाक, ओठ, भुवया, हनुवटी, जबडा आणि चेहऱ्याचा अन्य आकार याचा समावेश केला आहे. ज्या सर्जननं मोजमाप केलं आहे, तो लंडनमध्ये सेंटर फॉर एडवांस्ट फेशियल कॉस्मेटिक्स अॅड प्लास्टिक सर्जरी नावानं एक सेंटर चालवतात. 

त्यांनी या तंत्राला आपल्या कॉम्प्यूटरमध्ये फीड केलं आहे आणि त्याच्या आधारे मॅपिंग केलं आहे. इतंकच काय तर इतर अनेक सेलिब्रिटींचे चेहऱ्याचं मॅपिंग केल्यानंतर एम्बर हर्ड जिंकल्याचं सांगण्यात आलं आहे. 

ब्रिटीनच्या सर्जननं ज्या तंत्राचा वापर केला आहे, ते तंत्र हजारो वर्षांपासून चेहऱ्याचं सौंदर्य मोजण्यासाठी वापरलं जातं आहे. या तंत्राच्या आधारावर, एम्बर हर्डचा चेहरा 91.85 अचूक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी