सलाम: 'आई आणि ड्यूटी एकत्र कर्तव्य पार पाडेल ', सौम्या सोशल मीडियावर का झाली व्हायरल?

सौम्या पांडे प्रवासी मजुरांचे आंदोलन थांबवण्यासाठी मोदी नगर येथे कार्यरत होती. नोडल अधिकारी असल्याने तिला प्रशासन आणि वैद्यकीय विभाग यांच्यातील काम जपून करावे लागले.

soumya pandey sdm , lucknow
soumya chooses to handle both the lives wisely  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सौम्या पांडे प्रवासी मजुरांचे आंदोलन थांबवण्यासाठी मोदी नगर येथे कार्यरत होती
  • नोडल अधिकारी असल्याने तिला प्रशासन आणि वैद्यकीय विभाग यांच्यातील काम जपून करावे लागले.
  • देशात वैयक्तिक जीवनापेक्षा ड्यूटीला जास्त महत्त्व देणार्यांची कमतरता नाही.

लखनऊ :  देशात वैयक्तिक जीवनापेक्षा ड्यूटीला जास्त महत्त्व देणाऱ्यांची कमतरता नाही. अशा आश्वासक व्यक्तींमध्ये मोदीनगरची उपविभागीय दंडाधिकारी सौम्या पांडे हिचा समावेश आहे. तिच्या विचारसरणीची आणि उत्कटतेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे ती आई झाल्यानंतर 14 दिवसांनी आपल्या कामावर लगेच परतली आहे.

गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर तहसीलमध्ये एसडीएम म्हणून तैनात असलेल्या सौम्या पांडे प्रसूतीनंतर अवघ्या १४ दिवसांनी कामावर परतल्या आणि कोविड -19 च्या प्रबंधासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणूनही सज्ज झाल्या.

जुलै महिन्यात कोविडसाठी गाझियाबाद जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमणूक झाली तेव्हा मोदीनगरची उपविभागीय दंडाधिकारी सौम्या पांडे (वय 26) सात महिन्यांची गरोदर होती. अशा वेळी जेव्हा जिल्ह्यात दररोज सुमारे 100 प्रकरणांचा सामना करावा लागत होता तेव्हा तिच्याकडे मातृत्व रजा घेण्याचा एक चांगला पर्याय होता. परंतु तिच्यासाठी तिच्या सुट्टीपेक्षा समाज महत्त्वाचा होता, लोकांचे आरोग्य महत्वाचे होते. 17 सप्टेंबर रोजी तिने मेरठच्या दवाखान्यात एका मुलीला जन्म दिला आणि 14 दिवसानंतर ती कामावर परत आली.

https://twitter.com/i/status/1315553934912569344

स्वतःच्या जबाबदारीपेक्षा समाजाप्रती दायित्व महत्वाचे

सौम्या पांडेनी स्पष्ट केले की कोविडमुळे बरेच लोक जसे -डॉक्टर, परिचारिका व इतर बर्‍याच जणांसारखे ती काम करत आहे. अशा प्रसंगी तिला स्वतःची अधिकृत कर्तव्ये सोडू वाटली नाहीत. तिने फक्त 22 दिवसांची आवश्यक रजा घेतली आणि प्रसूतीच्या दोन आठवड्यांतच ड्यूटी करीता परतली. ती म्हणते की खरं तर स्वतःची जास्त काळजी करण्यापेक्षा तिने समाजाप्रती जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली.

कोविड-१९च्या प्रबंधासंबंधी होती जबाबदारी

सौम्या पांडे, प्रवासी कामगारांचे आंदोलन थांबवण्यासाठी कार्यरत होती. नोडल अधिकारी असल्याने तिला प्रशासन आणि वैद्यकीय विभाग यांच्यातील काम नीट करावे लागले. तिने कोविड रुग्णालयांना भेट दिली आणि डॉक्टर आणि रूग्णांशी संवाद साधला. त्या अनुषंगाने डेटाची देवाणघेवाण केली. डीएम आणि इतर सर्व अधिकार्यांनी माहिती पास करण्यात मदत करण्यासाठी कोविड हेल्पलाइनची स्थापना केली. विशेषत: दवाखान्यात भेटायच्या वेळी  तिने पूर्ण वेळ फेस शिल्ड, मास्क आणि ग्लोव्ह्ज परिधान केलेले. अशा रितीने पर्याप्त काळजी तिने स्वतःची घेतली.

अलाहाबाद एनआयटीला केला अभ्यास

अलाहाबादमधील एनआयटीमधून इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर ती  2016 मध्ये अखिल भारतीय रँकसह यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाली. मसूरी येथील सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये सुवर्णपदक मिळविणारी, संरक्षण मंत्रालयात प्रशिक्षण घेत असताना 'स्टार्ट-अप प्रोजेक्ट इन डिफेन्स एक्सेलेन्स' पुरस्काराने सन्मानित आहे सौम्या. ऑक्टोबर 2019 मध्ये तिला गाझियाबादमध्ये जॉइंट मॅजिस्ट्रेटचं पद देण्यात आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी