OMG: या व्यक्तीसमोर स्पायडरमॅन पण फेल! बिल्डिंगवर चढण्याची अनोखी शैली पाहून येईल बाहुबलीची आठवण

व्हायरल झालं जी
Updated Jun 15, 2022 | 12:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Man Climbing Building Video । सोशल मीडियावर सतत काही ना काही गोष्टी व्हायरल होत असतात. कधी फोटो तर कधी व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधतात. दरम्यान काही व्हिडीओ युजर्सचे मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ सगळ्यांनाच विचार करण्यास भाग पाडतात.

Seeing this person's unique style of climbing the building will remind you of Bahubali
या व्यक्तीसमोर स्पायडरमॅन पण झाला फेल, पाहा VIDEO   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर सतत काही ना काही गोष्टी व्हायरल होत असतात.
  • सध्या एका देशी स्पायडरमॅनचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
  • या व्यक्तीसमोर स्पायडरमॅन पण झाला फेल.

Man Climbing Building Video । मुंबई : सोशल मीडियावर सतत काही ना काही गोष्टी व्हायरल होत असतात. कधी फोटो तर कधी व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधतात. दरम्यान काही व्हिडीओ युजर्सचे मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ सगळ्यांनाच विचार करण्यास भाग पाडतात. सोशल मीडियावर तुम्ही अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील. आज आपण अशाच एका व्हिडीओ बद्दल भाष्य करणार आहोत, जो पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. कारण या व्हिडीओमध्ये एक माणूस स्पायडरमॅन सारखा चक्क बिल्डिंगवर चढत आहे. (Seeing this person's unique style of climbing the building will remind you of Bahubali). 

अधिक वाचा : SSC: ५ दिवसात कमी होणार दहावीच्या विद्यार्थ्यांची धकधक

या व्यक्तीसमोर स्पायडरमॅन पण फेल

व्हिडीओतील व्यक्तीचे कारनामे पाहून तुमचीही नजर हटणार नाही. लांब केस असलेला एक माणूस हाफ पँट घालून इमारतीजवळ येतो आणि भिंती आणि रेलिंग पकडत इमारतीच्या वर चढताना तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. तुम्ही सुपरमॅनला हॉलिवूड चित्रपटांमध्ये हे करताना पाहिले असेलच. लक्षणीय बाब म्हणजे ही धक्कादायक रील इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे. तसेच नेटकरी या व्यक्तीची तुलना स्पायडरमॅन सोबत करत आहेत. 

हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल 

या व्हिडीओने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे की, या व्यक्तीने इतक्या सहजतेने असा पराक्रम कसा केला. व्हिडीओमध्ये तुम्हाला ही व्यक्ती मोगलीसारखी उडी मारताना दिसेल. त्या व्यक्तीचे दिसणे आणि केशरचना काहीशी मोगलीसारखीच आहे हे तुम्ही पाहू शकता. एवढेच नाही तर ती व्यक्ती ज्या पद्धतीने भिंतींवर चढते हे पाहून साहजिकच बाहुबली चित्रपटाची आठवण येते. ज्यामध्ये चित्रपटाचा अभिनेता प्रभास पर्वतावर चढताना दिसतो. 

हा धक्कादायक व्हिडीओ into_the_fairies_world नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'तुम्ही हे करू शकता का?' अशी विचारणा करण्यात आली आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की, सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडीओला ६ लाखांहून अधिक लोकांनी लाईकही केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी