पार्टीत कंडोम घेऊन पोहचली १९ वर्षाची तरुणी, पुढे झाले 'हे' हाल

१९ वर्षीय हेअर ड्रेसर एका कार्यक्रमात जाताना आपल्या अंडरवेअरमध्ये कंडोममध्ये ड्रग्स लपवून नेत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

senior hairdresser tayah crowther hiding drugs in a condom in her innerwear police arrested
पार्टीत कंडोम घेऊन पोहचली १९ वर्षाची तरुणी, पुढे झाले 'हे' हाल  |  फोटो सौजन्य: Times Now

सिडनी: सुप्रसिद्ध हेअर ड्रेसर ताया क्रोथर ही अनेकदा  पार्ट्यांना हजेरी लावते. पण अलीकडेच तिला एका फेस्टिव्हला जाणं प्रचंड महागात पडलं आहे. जेव्हा १९ वर्षीय ताया क्रोथर ही एका म्युझिक फेस्टिव्हल (पार्टी) मध्ये पोहचली तेव्हा तिने असं काही केलं की, ज्यामुळे तिला थेट अटकच करण्यात आली आहे. खरं तर तायाने आपल्या अंतर्वस्त्रात एक कंडोम लपवून आणला होता. ज्यामध्ये तिने कोकेन आणि केटामाइन हे (ड्रग्स) लपवले होते.

१९ वर्षीय ताया क्रोथर ही सिडनीमध्ये वास्तव्यास आहे. ती १ जानेवारीला सिडनी येथे आयोजित फिल्ड डे फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. यावेळी ताया क्रोथरचा बॉयफ्रेंड देखील तिच्यासोबत होता. या फेस्टिव्हलदरम्यान पोलिसांनी जेव्हा ताया क्रोथरची तपासणी केली तेव्हा त्यांना तिच्याकडे काहीतरी संशयास्पद असल्याचं जाणवलं. त्यामुळे तात्काळ तिला एका खासगी तंबूत नेण्यात आलं आणि महिला पोलिसांकरवी तिची कसून तपासणी करण्यात आली. 

याचवेळी असं उघडकीस आलं की, तायाने तिच्या अंडरवेअरमध्ये काही तर लपवलं आहे. जेव्हा पोलिसांनी तायाला ती गोष्ट काढण्यास सांगितलं तेव्हा तिने एक लपविलेला कंडोम बाहेर काढला. ज्यामध्ये तीन छोट्या-छोट्या पिशव्या ठेवल्या होत्या. त्यामध्ये तिने कोकेन आणि केटामाइन लपवून आणलं होतं.

यानंतर पोलिसांनी तायाला तात्काळ अटक केली. नंतर तिला न्यायालयातही हजर करण्यात आलं. यावेळी तायाने कबूल केलं की, आपण चुकीचं काम करत आहोत. मात्र, तरीही ड्रग्सच्या आहारी गेल्याने कोकेन नेण्याची चूक केली. कोर्टात जेव्हा तिला हजर करण्यात आलं तेव्हा असं समोर आलं की, ताय ही  सिडनीमधील एका प्रसिद्ध सलूनमध्ये सीनियर हेअर ड्रेसर म्हणून काम करते. 

तपासा दरम्यान, तायाने पोलिसांना संपूर्ण सहकार्य केलं. बंदी असलेले ड्रग्स बाळगल्याप्रकरणी कोर्टाने आणखी दोन जणांना दोषी ठरवलं आहे. दरम्यान,  त्यानंतर कोर्टाने तायाला सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिने १२ महिने चांगली वर्तणूक करावी असंही म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी