7 People on bike : कर ले जुगाड कर ले! एकाच बाईकवर बसले सात जण, 4 मुलं आणि 2 महिलांनी असं केलं ‘ॲडजस्ट’

एका बाईकवर जास्तीत जास्त किती जण बसू शकतात, याचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळं देईल. पण तुमचं जे उत्तर असेल त्यापेक्षा जास्त व्यक्ती बाईकवर बसलेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल.

7 People on bike
एकाच बाईकवर बसले सात जण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एकाच बाईकवर बसले 7 जण
  • एका बाईकवर एक पुरुष, दोन बायका आणि चार मुले
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

7 People on bike | भारत हा जुगाडूंचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या गोष्टीची कुणी कल्पनाही करू शकत नाही, त्या गोष्टी लोक प्रत्यक्ष करतात आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणंही शक्य होत नाही. एका बाईकवर जास्तीत जास्त किती लोक बसू शकतात, याची कल्पना करण्यालाही काही मर्यादा असतात. एक बाईक ही जास्तीत जास्त दोन व्यक्तींना प्रवास करण्यासाठी तयार कऱण्यात आलेली असते. त्यावर एखादं लहान मूल सोबत असेल, तर समजण्यासारखं असतं. मात्र त्यापेक्षा अधिक जणांनी बसणं हे धोकादायक मानलं जातं. जर बाईकवर तीन प्रौढ व्यक्ती बसून प्रवास करताना आढळल्या तर तो गुन्हा ठरतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जितक्या व्यक्ती एका दुचाकीवर बसल्या, ते पाहून सगळेच थक्क झाले. 

एका बाईकवर सात व्यक्ती

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक पुरुष अगोदर बाईक घेऊन उभा असल्याचं दिसतं. त्याच्याजवळ इतर सहाजण उभे आहेत. यामध्ये चार मुलं आणि दोन महिला उभ्या असल्याचं दिसतं. एक पुरुष ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे. शेजारी उभी असणारी महिला अगोदर एका मुलाला उचलून त्याच्या पुढे ठेवते. त्यानंतर दुसऱ्या एका मुलाला पुढे ठेवते. आता बाईकवर बसलेल्यांची संख्या होते तीन. त्यानंतर एक महिला बाईकवर बसते. खाली उभी असलेली महिला दुसरं मूल बाईकवर बसलेल्या महिलेच्या मांडीवर देते. त्यानंतर बाईकवरील एकूण प्रवासी होतात पाच. मग ही महिला स्वतःसोबत खाली उरलेल्या एका मुलाला कडेवर उचलून घेते आणि त्याच्यासह बाईकवर बसते. अशा प्रकारे बाईकवर बसलेल्यांची संख्या होते सात. 

व्हिडिओ पाहून आश्चर्य

हे सगळं घडत असताना तिथं उपस्थित असणाऱ्या एकाने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका वेळी इतके लोक बाईकवर बसूच कसे शकतात, याचं आश्चर्य लोकांना वाटत आहे. तर अनेकांनी अशा तऱ्हेनं इतक्या लोकांनी एकाच वेळी बाईकवर बसणं त्यांच्या जिवाला धोकादायक असू शकतं, असं म्हटलं आहे. असे प्रकार फक्त आपल्याकडेच घडू शकतात, असा दावा काहींनी केला आहे, तर हा प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसेल, अशी कमेंट एकाने केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी